खरंच? मुंबईत केवळ ४१४ खड्डे बुजविण्याचं काम बाकी! 

मुंबई
Updated Aug 17, 2019 | 10:11 IST

माहितीच्या अधिकारात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या खड्डे संदर्भात समोर आलेल्या माहितीनं सर्वांनाच धक्का बसणार आहे. रस्त्यांवरील खड्डे हे सर्वांसाठीच त्रासदायक असतात. 

Mumbai Potholes
खरंच? मुंबईत केवळ ४१४ खड्डे बुजविण्याचं काम बाकी!   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • खड्ड्यांच्या तक्रारींमध्ये ५४ टक्के वाढ
  • ९० टक्के खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा
  • एका खड्ड्याचा खर्च १७ हजार रूपये

मुंबईः रस्त्यांवर असलेले खड्डे हे वाहनचालकांसाठी मोठा त्रास असतो. या खड्ड्यांचा अतोनात त्रास सहन करावा लागतो तसंच या खड्ड्यांनं अनेकांचे बळी सुद्धा घेतलेत. त्यातच मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झालेली पाहायला मिळतेय. अनेक रस्त्यांवर मोठंमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच आता माहितीच्या अधिकारातून या खड्ड्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत केवळ ४१४ खड्डे बुजविण्याचं काम शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीत केवळ एक खड्डा बुजविण्यासाठी मुंबई महापालिकेनं तब्बल १७ हजार ६९३ रूपये खर्च केल्याचं आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी समोर आणली. एवढंच काय तर गेल्या वर्षांच्या तुलनेत एप्रिल ते जुलै २०१९ या चार महिन्यांता ५४ टक्क्यांहून अधिक खड्ड्यांच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्यात. 

२०१३ ते २०१९ या सहा वर्षांतली खड्ड्यांची संख्या आणि खड्डे बुजविण्यावर झालेला एकूण खर्च माहितीच्या अधिकारात उघड झाला आहे.  तसंच मुंबईतल्या रस्त्यांसाठी २०१८- १९ यामध्ये ४ हजार ८९८ खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या तिजोरीतले तब्बल सात कोटी ९८ लाख ७ रूपये खर्च करण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार, २०१७ ते २०१८ या कालावधीत महापालिकेनं एकूण ३९८१ खड्डे बुजवले असून त्यासाठी एकूण ७ कोटी ७३ लाख २२ रूपये खर्च केले गेले. त्यामुळे एकूण सरासरी बघता एक खड्डा बुजविण्यासाठी महापालिकेला १७ हजार ६९३ रूपये खर्च आला आहे. एवढे पैसे खर्च करूनही खड्ड्यांच्या त्रासातून नागरिकांची काही सुटका झाली नाही. 

ही माहिती समोर आल्यानंतर आता खड्डे बुजविण्यासाठी इतका खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचा त्रास तसाच आहे. त्यामुळे रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि ते बुजविण्यासाठी येणारा खर्च पालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करावा अशी मागणी होत आहे. पोटहोल ट्रॅकिंग सिस्टिम या वेबसाईटमुळे मुंबईतल्या खड्ड्यांची आकडेवारी समोर येत होती. त्यामुळे पालिका टीकेची धनी ठरत होती. म्हणून प्रशासनानं खड्ड्यांची नोंद ठेवणारी यंत्रणाचा बंद केली. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबईतल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलत. १० जून ते १ ऑगस्ट २०१९ या कालावधीत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविषयी पालिकेकडे २ हजार ६४८ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी २ हजार ३३४ तक्रारींचं निवराण करण्यात आल्याचा दावा पालिकेनं केला. त्यातच गेल्या सहा वर्षांत २४ हजार १४६ तक्रारी पालिकेला आल्या. त्यापैकी २३ हजार ८८८ तक्रारीचं निवारण पालिकेकडून करण्याची आल्याची माहिती पालिकेनं आपल्या रिपोर्टमध्ये दिली. या माहितीच्या आधारानुसार, दरवर्षी ९० ते १०० खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेनं केला आहे. 

एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या काळात ४ हजार ९१० खड्ड्यांच्या तक्रारी पालिकेकडे आल्या.  गेल्या चार महिन्यात म्हणजेच १ एप्रिल ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत पालिकेला खड्ड्यांबाबत  २ हजार ६६१ ऑनलाइन तक्रारी मिळल्या. त्यानुसार पालिकेनं २ हजार ४६२  तक्रारींचं निवारण केलं. तर फक्त १९९ तक्रारींचं अजूनही निराकरण केलं गेलं नाही. यामध्ये सर्वाधिक ३६५ तक्रारी अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी या भागातून आल्यात. भांडूप या भागातून २१८, मालाड, मालवणी १९३ आणि अंधेरी पश्चिम या भागातून १८८ तक्रारी आल्यात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...