Mumbai: Buffalo milk price to shoot up by Rs 5litre from March 1 : मुंबईत सध्या म्हशीचे दूध 80 रुपये लिटर या दराने विकले जाते. पण बुधवार 1 मार्च 2023 पासून मुंबईत म्हशीचे दूध महागणार आहे. म्हशीच्या दुधाच्या दरात 5 रुपयांची दरवाढ होणार आहे. ही दरवाढ 31 ऑगस्ट 2023 पर्यंत राहणार आहे. मुदत संपण्याआधीच दराचा नव्याने आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने म्हशीच्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत 3 हजारांपेक्षा जास्त विक्रेते म्हशीचे दूध विकतात. या रिटेलरना म्हशीचे दूध सध्या 80 रुपये लिटर दराने मिळते. पण बुधवार 1 मार्च 2023 पासून मुंबईत रिटेलरना म्हशीचे दूध 85 रुपये लिटर दराने मिळेल. किरकोळ ग्राहकांना म्हशीचे 1 लिटर दूध 90 ते 95 रुपयांना मिळेल. नव्या किंमती 1 मार्च 2023 पासून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत राहणार आहेत.
मुंबईत म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात याआधी सप्टेंबर 2022 मध्ये वाढ करण्यात आली होती. या दरवाढीमुळे म्हशीचे 1 लिटर दूध 75 रुपयांवरून 80 रुपयांवर पोहोचले होते.
चारा, औषधे, दूध वाहतूक खर्च, प्राण्यांच्या देखभालीवर आणि वैद्यकीय उपचारांवर होणार खर्च यात झालेल्या दरवाढीचा विचार करून दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे, असे मुंबई दुग्ध उत्पादक संघाचे म्हणणे आहे.
Hydrogen Buses in India: भारतात चालणार हायड्रोजन बसेस, धुराऐवजी सोडणार पाणी
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.