मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी

मुंबई
Updated Sep 11, 2019 | 07:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेल्या एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Mumbai: part of building collapse crawford market
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • मुंबईत इमारतीचा भाग कोसळला
  • मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील घटना
  • अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

मुंबई: मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेल्या एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दक्षिण मुंबईत असलेल्या युसूफ इमारतीचा काही भाग रात्रीच्या सुमारास कोसळला आहे. या इमारतीत अनेक दुकाने असल्याची माहिती समोर येत आहे.

इमारतीचा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली अद्यापही काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्या बाजुला करण्याचं काम सुरू आहे. 

क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेल्या लोहार चाळ येथे युसूफ नावाची इमारत आहे. ही इमारत चार मजली असून त्याचा काही भाग रात्रीच्या सुमारास अचानक कोसळला. क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेल्या युसूफ इमारतीचा काही भाग कोसळला असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर तात्काळ मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं आहे.  

डोंगरी इमारत दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरातच इमारत कोसळून एक मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ११ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेनंतर जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता मात्र, घटनेच्या अवघ्या काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली असल्याचं दिसत आहे. मुंबई आणि उपनगरात अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत आणि या इमारतींमध्ये नागरिक राहत आहेत. प्रशासनाने वेळीच याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी