Mumbai Metro Route : कसारा, पनवेल,पालघरपासून मुंबईचं अंतर अर्ध्या तासात आता पार करता येणार आहे. रॅपिड ट्रॉन्सपोर्टसाठी प्लॅन तयार करण्यात येत आहे. या ट्रॉन्सपोर्टमुळे मुंबई बाहेर जी शहरं आहेत ते गाठण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. कर्जत,कसारा,पनवेलचा प्रवास अवघ्या अर्ध्या तासात करता येणार आहे. मुंबईच्या वाहतुकीला वेग देण्यासाठी रॅपिड ट्रान्सपोर्ट अर्थातच जलद मेट्रोची चाचपणी करण्यात आल्याच म्हटलं जात आहे. मेट्रो-5 मुळे उल्हासनगरचा प्रवासही आता उल्हासदायक होणार आहे.
उल्हासनगर हे औद्योगिक शहर असून येथे दररोज मोठ्या संख्येने अवजड मालवाहू वाहने येतात. कपडे आणि फर्निचर खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक येथे येतात. त्यामुळे येथे लोकांची आणि वाहनांची गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरडीएने ‘मेट्रो 5’चा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक वाचा :ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यावर X का लिहिलेला असतो?
एमएमआरडीएने ठाणे- भिवंडी-कल्याण रुटचा खडकपाडा मार्गे उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याचे ठरवले आहे. कल्याण-खडकपाडा आणि परत खडकपाडा ते उल्हासनगर अशी 7.7 किमीचे दोन मार्ग बांधण्यात येणार आहे. या रुटचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करावी लागणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव एमएमआरडीए प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात 337 किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणण्यात येत असून यापैकी सध्या काम सुरू असलेली एक मेट्रो मार्गिका म्हणजे ‘मेट्रो5’. ही मार्गिका 24.9 किमी लांबीची असून यासाठी 8 हजार 416 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गिकेवर 17 मेट्रो स्थानकांचा समावेश असून या मार्गिकेमुळे ठाणे –कल्याण प्रवास अतिजलद होणार आहे.
अधिक वाचा : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन
या मार्गिकेचे दोन टप्प्यात काम सुरू असून ठाणे –भिवंडी या पहिल्या टप्प्याचे फेब्रुवारीपर्यंत अंदाजे 71 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर भिवंडी – कल्याण या दुसऱ्या टप्प्याचे काम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. आता या मार्गिकेचा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दुजोरा दिला आहे.
अधिक वाचा :भारतातले सर्वात लहान नावाचे रेल्वे स्टेशन
तसेच कर्जत,कसारा,पनवेल,ठाणे-डोंबिवली ही लांब अंतरावर असलेली स्टेशन्स आता मेट्रोने जोडली जाऊ शकतात. यासाठी मेट्रोच्या रेल कॉर्पोरेशन अधिका-यांनी दिल्लीच्या मेट्रोलाही भेट दिली आहे. यावेळी जलद मेट्रोचा उपयोग जाणून घेतल्याचे व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडेंनी सांगितले आहे.
अधिक वाचा : सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचे मराठी भाषण
दिल्लीतील हा जलद मेट्रो प्रकल्प यशस्वी ठरला आहे. या जलद मेट्रोचा ताशी वेग 180 किमी प्रतितास असा आहे. यामुळे हा जलद मेट्रो प्रकल्प लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरू शकतो. मुंबईत जवळपास आठ मार्गिकांचे काम सुरू आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे विणले जात आहे. त्याअंतर्गत एकूण 14 मार्गिकांचे नियोजन करण्यात आले आहे. याद्वारे मुंबई शहर, उपनगरासह महामुंबई क्षेत्र एकमेकांशी जोडले जात आहे. यात मुंबईच्या भुयारी मेट्रो प्रकल्पासह ठाणे मेट्रो प्रकल्पाचा देखील समावेश आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.