Jumbo Megablock : मुंबई मध्य रेल्वेवर 27 तासांचा जम्बो मेगाब्लॉक, अनेक एक्सप्रेसही रद्द

Jumbo Megablock : मुंबईतील दीडशे वर्ष जुना कार्नॅक ब्रिज पाडला जाणार आहे. त्यामुळे 19 आणि 20 नोव्हेंबर शनिवार आणि रविवार रोजी भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान 27 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 11 वाजता हा ब्लॉक सुरू होणार आहे. या दरम्यान भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा दरम्यान सर्व लोकल सेवा बंद असणार आहे.

jumbo megablock
जम्बो मेगाब्लॉक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील दीडशे वर्ष जुना कार्नॅक ब्रिज पाडला जाणार आहे.
  • त्यामुळे 19 आणि 20 नोव्हेंबर शनिवार आणि रविवार रोजी भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान 27 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  
  • मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 11 वाजता हा ब्लॉक सुरू होणार आहे.

Jumbo Megablock : मुंबई  : मुंबईतील दीडशे वर्ष जुना कार्नॅक ब्रिज पाडला जाणार आहे. त्यामुळे 19 आणि 20 नोव्हेंबर शनिवार आणि रविवार रोजी भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान 27 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 11 वाजता हा ब्लॉक सुरू होणार आहे. या दरम्यान भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा दरम्यान सर्व लोकल सेवा बंद असणार आहे. मध्य रेल्वेच्या भायखळा, दादर आणि हार्बर मार्गावरील वडाळ्याहून बसेसची सुविधा केली जाणार आहे.  (mumbai Carnac Bridge will demolished 27 hour jumbo megablock on 19th and 20th november )

अधिक वाचा : Crime : प्रेमात आला संशय...दिली 65 तोळे सोन्याची सुपारी... पत्नीनेच घडवून आणली हत्या, पाहा सिनेमास्टाइल गुन्हा


जम्बो मेगाब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा मार्गावर सर्व धिम्या मार्गावारील लोकल सेवा १७ तासांसाठी बंद असणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळ्यादरम्यान 21 तासांसाठी लोकल सेवा बंद असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सेवा 27 तासांसाठी निलंबित करण्यात आल्या आहेत. 

अधिक वाचा : EWS Reservation : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल...तर लक्षात ठेवा या 5 गोष्टी

भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान 27 तासांसाठी मेल एक्सप्रेस गाड्यांना धावणार नाहीत. तर या जम्बो मेगाब्लॉक दरम्यान 36 मेल एक्सप्रेस पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. जम्बो मेगाब्लॉक दरम्यान दादर, पनवेल, नाशिक आणि पुणे 36 मेल एक्सप्रेस पूर्णपणे आणि 68 मेल एक्सप्रेस आंशिक रुपाने पूर्णपणे रद्द केल्या जाणार आहेत. 

अधिक वाचा :   EWS  Quota : आर्थिक मागासवर्गीयांसाठी 10 टक्के आरक्षण राहणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी