Mumbai : Central Railway announce traffic blocks for maintenance work on Bhivpuri Road to Karjat down line : मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर 5 रात्र ब्लॉक (traffic block) असेल. या काळात रुळांमधील स्लीपर्सची दुरुस्ती आणि खडीची स्वच्छता करण्यासाठी बीएसएम मशिनच्या मदतीने काम केले जाईल. कर्जत आणि भिवपुरी रोड (Bhivpuri Road to Karjat down line) दरम्यान 5 रात्र ब्लॉक असेल. हा ब्लॉक १९ फेब्रुवारीच्या पहिल्या लोकलपर्यंत असेल.
मध्यरात्री १.५० ते पहाटे ४.५० वाजेपर्यंत पाच रात्र मध्य रेल्वे मार्गावर कर्जत आणि भिवपुरी रोड (Bhivpuri Road to Karjat down line) दरम्यान ब्लॉक असेल. ब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतसाठी रात्री १२.२४ वाजता सुटणारी शेवटची लोकल बदलापूरपर्यंत धावेल. तसेच कर्जतहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी निघणारी मध्यरात्री २.३३ची पहिली लोकल कर्जत ऐवजी बदलापूर येथून प्रवासाची सुरुवात करेल.
रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना कर्जतची शेवटची लोकल पकडून घरी जाता येते. पण ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. कर्जतहून पहिल्या लोकलने भाऊच्या धक्क्यावर मासे घेण्यासाठी आणि कामावर येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या प्रवाशांना पहिली लोकल एक तास विलंबाने उपलब्ध होणार आहे.
पोरांनो ऐकलं का ! मास्तर शाळेत पाच दिवस नसणार; पण का असेल गुरुजींची सुट्टी?, वाचा कारण
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.