Mumbai AC Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, एसी लोकलच्या संख्येत होणार वाढ

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त केंद्र सरकारकडून मुंबईकरांना एक गिफ्ट मिळणार आहे. मुंबईकरांचा लोकलप्रवास आणखी गारेगार होणार असून एसी लोकलची संख्या आणखी वाढणार आहे. रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेवर लवकरच १० आणखी एसी लोकलची भर पडणार आहे.

mumbai AC local
मुंबई एसी लोकल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त केंद्र सरकारकडून मुंबईकरांना एक गिफ्ट मिळणार आहे.
  • मुंबईकरांचा लोकलप्रवास आणखी गारेगार होणार असून एसी लोकलची संख्या आणखी वाढणार आहे.
  • मध्य रेल्वेवर लवकरच १० आणखी एसी लोकलची भर पडणार आहे.

Mumbai AC Local : मुंबईः  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त केंद्र सरकारकडून मुंबईकरांना एक गिफ्ट मिळणार आहे. मुंबईकरांचा लोकलप्रवास आणखी गारेगार होणार असून एसी लोकलची संख्या आणखी वाढणार आहे. रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेवर लवकरच १० आणखी एसी लोकलची भर पडणार आहे. (mumbai central railway get more 10 ac local on 75th independence day of india )

अधिक वाचा : Vinayak Mete: विनायक मेटेंसोबत घात की अपघात?, भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले...

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई लोकल सेवेत आणखी १० एसी लोकल दाखल होणार आहेत. या १० लोकलपैकी ४ लोकल बदलापूर ते सीएसएमटी दरम्यान धावणार आहे. तर ४ लोक ठाणे ते सीएसमटी आणि २ कल्याण ते सीएसएमटी दरम्यान धावणार आहेत. यापूर्वी मध्य रेल्वेवर ५६ एसी लोकल धावत होत्या. त्यात १० एसी लोकलची भर पडल्याने एकूण एसी लोकलची संख्या ६६ वर पोहोचणार आहे.

अधिक वाचा : Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १२१४८ कोरोना Active, आज ११८९ रुग्ण, १ मृत्यू

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मुंबईसाठी १० एसी लोकल मिळणार आहे. आतापर्यंत मुंबईकरांसाठी ५६ एसी लोकल धावत होत्या तर आता त्यात १० आणखी एसी लोकलची भर पडणार आहे.

अधिक वाचा : Mumbai Police: मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला 'इथून' केली अटक

मध्य रेल्वेवरील धावत असलेल्या ५६ एसी सेवांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. या लोकलमधून प्रवास करणार्‍र्‍या प्रवाशांची संख्या वाढत होती. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सुरूवातीला एसी लोकलमधून ५ हजार प्रवासी या एसी लोकलमधून प्रवास करत होते. त्यात सात पटीने भर पडून प्रवाशांची संख्या ३५ हजारांवर गेली आहे. प्रवाशांचा एसी लोकलसाठी उत्तम प्रतिसाद पाहता आता एसी लोकलमध्ये १० लोकलची भर घालण्यात आली आहे.

अधिक वाचा : Shinde Govt: दीपक केसरकर नाराज.. हवं होतं आदित्य ठाकरेंचं खातं, पण...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी