BEST BUS ROUTE : बेस्ट बसच्या मार्गात बदल

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 02, 2022 | 17:27 IST

MUMBAI : CHANGE IN BEST BUS ROUTE : बेस्टने नवे बसमार्ग सुरू केले आहेत. बोरिवली ते कांदिवली ही २८४ क्रमांकाची तसेच घाटकोपर पश्चिम येथील ए ३८९ क्रमांकाची बस सुरू करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सात बसमार्गांचे विस्तारीकरण करण्यात आले. 

MUMBAI : CHANGE IN BEST BUS ROUTE
BEST BUS ROUTE : बेस्ट बसच्या मार्गात बदल 
थोडं पण कामाचं
 • BEST BUS ROUTE : बेस्ट बसच्या मार्गात बदल
 • दोन नवे बसमार्ग सुरू
 • सात बसमार्गांचे विस्तारीकरण

MUMBAI : CHANGE IN BEST BUS ROUTE : मुंबई : बेस्टने नवे बसमार्ग सुरू केले आहेत. बोरिवली ते कांदिवली ही २८४ क्रमांकाची तसेच घाटकोपर पश्चिम येथील ए ३८९ क्रमांकाची बस सुरू करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सात बसमार्गांचे विस्तारीकरण करण्यात आले. 

BEST AC BUS 'बेस्ट' घोषणा, विमानतळावरुन बोरिवली आणि वाशीसाठी एसी बस

 1. बोरिवली पश्चिम स्टेशन ते कांदिवली पश्चिम स्टेशन ही २८४ क्रमांकाची बस साईबाबा नगर मार्गे धावणार. सकाळी ७.३५ ते रात्री १०.३० या वेळेत बस धावणार.
 2. घाटकोपर पश्चिम स्टेशन येथून भटवाडी , बर्वे नगर, मुक्ताबाई रुग्णालय अशी फिरुन पुन्हा घाटकोपर पश्चिम स्टेशन पर्यंत ए ३८९ ही बस सकाळी ६.१५ ते रात्री ९.५० या वेळेत धावेल.

बस मार्गांचा विस्तार

 1. ए १ - आर सी चर्च ते माहीम दरम्यान धावणारी ए १ बस आता वांद्रे रेक्लेमेशन बस स्थानकापर्यंत धावणार
 2. ए ३० - इलेक्ट्रिक हाऊस ते राणी लक्ष्मीबाई चौक दरम्यान धावणारी बस आता चुनाभट्टीपर्यंत धावेल
 3. बस क्रमांक ४५ - एमएमआरडीए वसाहत माहुल ते मंत्रालय दरम्यान धावणारी बस बॅकबे आगारापर्यंत धावेल
 4. बस क्रमांक १२६ - जिजामाता उद्यान ते ऑगस्ट क्रांती मैदान दरम्यान धावणारी बस गिरगाव मेट्रो  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गे स्वामी दयानंद सरस्वती चौक फोर्ट मार्केट पर्यंत धावेल
 5. बस क्रमांक २०० - यारी मार्ग बस स्थानक ते माहीम दरम्यान धावणारी बस शिवाजी पार्क खोदादाद सर्कल मार्गे वडाळा आगारापर्यंत जाईल
 6. बस क्रमांक ३८८ - कन्नमवार नगर २ ते कुर्ला आगार दरम्यान धावणारी ३८८ मर्यादीत बस आता सांताक्रूझ बस स्थानक पूर्व पर्यंत धावेल
 7. ए  ४१ - भाऊचा धक्का (रो पॅक्स टर्मिनस) ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी बस आता कुलाबा बस स्थानकापर्यंत जाईल

बस मार्गातील बदल आणि बदलेला क्रमांक

 1. बस क्रमांक सी २ - इलेक्ट्रिक हाऊस ते धारावी आगार दरम्यान धावणारी बस आता सी ११ या क्रमांकाने धावेल
 2. बस क्रमांक ए ११६ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एन सी पी ए दरम्यान धावणारी ए ११६ आता गेट वे ऑफ इंडिया येथून सुटेल.
 3. बस क्रमांक ए ३७२ - ट्रॉम्बे ते घाटकोपर आगार दरम्यान धावणाऱ्या ए ३७२ चा मानखुर्द स्थानक (दक्षिण) येथील दोन्ही बाजूचा वळसा रद्द
 4. बस क्रमांक ए ६६ - बॅलार्ड पियर ते राणी लक्ष्मीबाई चौक दरम्यान धावणारी वातानुकूलित ए ६६ बस आता ६६ साधी म्हणून धावेल.
 5. बस क्रमांक सी ४२ - राणी लक्ष्मीबाई चौक सायन ते बाळकूम दादलानी  पार्क (ठाणे) दरम्यान धावणारी साधी बस वातानुकूलित ए सी ४२ म्हणून धावेल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी