Railway App : पावसाळ्यात रेल्वे रखडल्यास मिळतील Live Updates

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 13, 2022 | 16:32 IST

Mumbai: Commuters Of Central Railway Can Track Live Status Of Local :रेल्वेने एक अॅप लाँच केले आहे. या अॅपमुळे प्रत्येक लोकलमध्ये बसवलेल्या जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने संबंधित गाडी नेमकी कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती मिळवणे सोपे होणार आहे.  

Mumbai: Commuters Of Central Railway Can Track Live Status Of Local
Railway App : पावसाळ्यात रेल्वे रखडल्यास मिळतील Live Updates  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Railway App : पावसाळ्यात रेल्वे रखडल्यास मिळतील Live Updates
  • यात्री अॅपमधील डेटा दर १५ सेकंदांनी अपडेट होणार
  • लोकल नेमकी कुठे आहे याची माहिती देणार

Mumbai: Commuters Of Central Railway Can Track Live Status Of Local : पावसाळ्यात रुळांवर पाणी साचल्याने लोकल विलंबाने धावणे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी नवे नाही. पावसाळ्याच्या दिवसांत अधूनमधून असे प्रकार घडतात. पण याबाबतची ताजी माहिती घेण्यासाठी रेल्वे स्टेशन हाच अनेक वर्षांपासून सर्वोत्तम पर्याय होता. स्टेशनवर उद्घोषणा यंत्रणेद्वारे रेल्वे प्रशासन गाड्यांच्या ताज्या स्थितीबाबत माहिती द्यायचे आणि प्रवाशांना नेमक्या परिस्थितीचा अंदाज यायचा. या माहितीआधारे प्रवासी पुढल्या प्रवासाचे नियोजन करायचे. पण आता ही परिस्थिती बदलली आहे. रेल्वेने एक अॅप लाँच केले आहे. या अॅपमुळे प्रत्येक लोकलमध्ये बसवलेल्या जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने संबंधित गाडी नेमकी कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती मिळवणे सोपे होणार आहे.  

रेल्वे प्रवाशांना अॅपच्या मदतीने कोणती गाडी कोणत्या ठिकाणी आहे आणि आपण ज्या गाडीची वाट बघत आहोत ती किती वेळात स्टेशनवर पोहोचणार आहे याची नेमकी माहिती मिळेल. स्टेशनवर पोहोचल्यावर गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर जाणार याबाबतही माहिती मिळेल. यामुळे अॅपची मदत घेऊन प्रवासी त्यांच्या पुढील प्रवासाचे नियोजन सहज करू शकतील. प्रवाशांच्या वेळेची बचत होईल आणि त्यांची दगदग कमी होण्यास मदत होईल. 

स्टेशनवरील आवाजात काही वेळा उद्घोषणा यंत्रणेद्वारे दिलेली माहिती ऐकू येत नाही. काही वेळा अर्धवट ऐकल्यामुळे गैरसमज होतात. हा गोंधळ अॅपमुळे टळणार आहे. रेल्वे संदर्भात  प्रवाशांना अचूक माहिती प्रवास सुरू होण्याच्या काही वेळ आधीच मिळणार आहे.

रेल्वेचे अॅप जीपीएस ट्रॅकरद्वारे लोकलविषयीचे ताजे अपडेट पुरवणार आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर हे अॅप कार्यरत झाले आहे. यात्री अॅप नावाचे अॅप मध्य रेल्वेच्या सर्व लोकलमधील जीपीएस ट्रॅकरद्वारे कोणती गाडी नेमकी कोणत्या जागेवर आहे याची माहिती देणार आहे.

यात्री अॅपमधील डेटा दर १५ सेकंदांनी अपडेट होणार आहे. सुरुवातीला बेलापूर ते खारकोपर दरम्यान गाड्यांविषयीचे लाइव्ह अपडेट मिळतील. लवकरच मध्य रेल्वेच्या सर्व लोकलविषयीची माहिती अॅपद्वारे उपलब्ध होईल.

सध्या भारतात एम इंडिकेटर नावाच्या अॅपच्या मदतीने कोणती गाडी कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती मिळते. पण या अॅपमध्ये प्रवासी स्वतःचे जीपीएस लोकेशन अॅक्टिव्ह करून त्याच्या माध्यमातून कोणती गाडी कुठे आहेत याची माहिती देतात. या उलट यात्री अॅपमध्ये लोकलमधील जीपीएस ट्रॅकर लोकल नेमकी कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती देणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी