Viral Video: एका रात्रीतून सोशल मीडिया स्टार बनलेले मुंबईतील (Mumbai Police) नायगाव येथील पोलिस कॉन्स्टेबल अमोल यशवंत कांबळे (Mumbai Cop Amol Kambale Dance Video) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अमोल कांबळे यांचा क्रेझी डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अमोल कांबळे यांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अनुष्का शर्माचा चित्रपट बँड बाजा बारातमधील सॉंग 'दम दम' या गाण्यावर डान्स करून चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. (Mumbai Cop Amol Yashwant Kamble Dance Video Viral On Social Media Dum Dum)
पोलिस कॉन्स्टेबल अमोल कांबळे यांनी डान्सिंगचा छंद जोपासला आहे. ड्युटी झाल्यानंतर ते डान्सची प्रॅक्टिस करत असतात. अमोल कांबळे यांचा क्रेझी व्हायरल डान्स व्हिडिओ इंटरनेटवर ट्रेंड करत आहे. अमोल त्यांच्या डान्स मूव्जने नागरिकांचं मनोरंजन करत असतात. अमोल यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. डान्सर हर्ष कुमार यांच्यासोबत अमोल कांबळे यांनी अनुष्का शर्मा और रणवीर सिंह यांचा चित्रपट 'बँड बाजा बारात' या चित्रपटातील साँग्स 'दम दम'वर धम्माल डान्स केला आहे. हर्ष कुमार आणि अमोर आपल्या डान्समध्ये हुकस्टेप करताना दिसत आहेत. “@harshkumarofficiall हीच माझी इच्छा होती आणि तुम्ही ती पूर्ण केली. खूप खूप धन्यवाद सर, असं कॅप्शन व्हिडिओ खाली दिलं आहे.
या आधी अमोल यांनी 'अप्पू राजा' चित्रपटातील साँग 'आया है राजा'वर मजेदार डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ अल्पावधीत तुफान व्हायरल झाला होता.
सर्वात सक्षम आणि कार्यक्षम... अशी मुंबई पोलिस दलाची ओळख आहे. याच पोलिस दलातील 38 वर्षीय कॉन्स्टेबल अमोल कांबळे यांनी स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमोल कांबळे यांनी पोलिस सेवेसोबतच आगळा वेगळा छंद जोपासला आहे. तो म्हणजे डान्सिंगचा. अमोल यांना बालपणापासूनच डान्सिंगची आवड आहे. माहिम येथील राहाणारे अमोल हे 2004 मध्ये पोलिस दलात दाखल झाले. पोलिस दलात रुजू होण्यापूर्वी अमोल त्यांचा थोरला भाऊ कोरिओग्राफर आहे. ते भावासोबत डान्स शो देखील करत होते.
अमोल कांबळे सांगतात की, एक पोलिस सेवक असल्याने, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांचे रक्षण करणे ही माझी पहिली जबाबदारी आहे. परंतु साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मी माझ्या मुलांसोबत, माझ्या बहिणीच्या मुलांसोबत डान्स करून धम्माल मज्जा मस्ती करतो.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.