Mumbai Corona Update: वाढत्या कोरोना संकटामुळे बीएमसीनं मुंबईत जारी केली मार्गदर्शक तत्त्वे, जाणून घ्या काय आहेत नवीन नियम

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 07, 2022 | 06:51 IST

मुंबईत कोरोनाने पुन्हा पाय पसरायला सुरुवात केली असून या कोरोनाच्य वाढत्या संक्रमणाकडे चौथी लाट म्हणून पाहिले जात आहे. हे टाळण्यासाठी बीएमसीने (BMC) खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात बीएमसीने अनेक मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी केली आहेत. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत कोविड-19 च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

Guidelines issued by BMC on the growing corona crisis
वाढत्या कोरोना संकटामुळे बीएमसीनं जारी केली मार्गदर्शक तत्वे  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सर्व सार्वजनिक शौचालये दिवसातून ५ वेळा स्वच्छ केली जातील.
  • BMC ने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन आदेश जारी केले
  • नागरिकांना मास्क घालण्याचे आणि कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

Covid Alert in Mumbai: मुंबईत कोरोनाने पुन्हा पाय पसरायला सुरुवात केली असून या कोरोनाच्य वाढत्या संक्रमणाकडे चौथी लाट म्हणून पाहिले जात आहे. हे टाळण्यासाठी बीएमसीने (BMC) खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात बीएमसीने अनेक मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी केली आहेत. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत कोविड-19 च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

रविवारी येथे नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) संख्या 900 च्या पुढे गेली होती. दरम्यान वेगाने वाढणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीने सर्व प्रयोगशाळा आणि रुग्णालयांना (hospitals) सतर्क केले आहे. BMC ने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्याला तोंड देण्यासाठी नवीन आदेश जारी केले आहेत.  बीएमसीने आपल्या आदेशात सर्व नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. बीएमसीने सांगितले की, सध्या मास्कसाठी चालान केले जात नाही, परंतु ते स्वतःच्या सुरक्षेसाठी खूप महत्वाचे आहे. याशिवाय पावसाळ्याच्या सुरुवातीला पाण्यामुळे पसरणाऱ्या डासजन्य आजारांबाबतही पालिकेकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

बीएमसीने जारी केली ही मार्गदर्शक तत्त्वे 

बीएमसीने जारी केलेल्या सूचनांमध्ये नागरिकांना मास्क घालण्याचे आणि कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय आरोग्य विभागालाही चाचण्या वाढवण्यास सांगण्यात आले आहे. BMC अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व जंबो कोविड केंद्रे, चाचणी प्रयोगशाळा तसेच खाजगी रुग्णालयांना कोरोनाच्या चौथ्या लाटेसाठी आगाऊ तयार राहण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचा एक भाग म्हणून सर्व झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता करण्याचे काम केले जाणार आहे. सर्व सार्वजनिक शौचालये दिवसातून ५ वेळा स्वच्छ केली जातील.  जेणेकरुन कोविड सोबतच मान्सूनशी संबंधित आजारांचा प्रसारही रोखता येईल. याशिवाय संथ गतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेलाही गती दिली जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी