Mumbai Corona Update : मुंबईतील रहिवासी इमारतींबाबत नवी नियमावली; रुग्ण आढळल्यास अख्खा मजला होणार सील

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 04, 2022 | 07:16 IST

Regulations Regarding Residential Buildings : मुंबईतील कोरोनाबाधितांच्या (Corona patient) संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. मुंबईत (Mumbai) काल 8 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जात आहेत. 

regulations regarding residential buildings in Mumbai
मुंबईतील रहिवासी इमारतींसाठी नवी नियमावली जाहीर  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील शाळा बंद ठेण्याच्या निर्णयानंतर आता रहिवाशी इमारतींविषयी नियम जारी
  • मुंबईतील रहिवासी इमारतीच्या एकूण क्षमतेपैकी 20 टक्के नागरिक कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण विंग किंवा इमारत सील होणार
  • एखाद्या मजल्यावर सक्रिय रुग्ण आढळले तर तो मजला सील करण्यात येणार आहे.

Mumbai Corona Update : मुंबई :  मुंबईतील कोरोनाबाधितांच्या (Corona patient) संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. मुंबईत (Mumbai) काल 8 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जात आहेत. 

मुंबईतील शाळा बंद ठेण्याच्या निर्णयानंतर आता रहिवाशी इमारतींविषयी नियम जारी केला आहे. जर कोरोना रुग्ण आढळून आल्यास पूर्ण  इमारत सील करण्याबाबत महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली आहे. मुंबईतील रहिवासी (residential) इमारतीच्या (buildings) एकूण क्षमतेपैकी 20 टक्के नागरिक कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण विंग किंवा इमारत सील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कोरोना रुग्ण आढळलेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी महापालिकेने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असणार आहे.

मुंबईसाठी जाहीर करण्यात आलेली नियमावली खालीलप्रमाणे :

  • एखाद्या मजल्यावर सक्रिय रुग्ण आढळले तर तो मजला सील करण्यात येणार आहे.  
  • इमारतीत 10 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाणार.
  • कोरोना रुग्ण सापडलेल्या मजल्यावर बाहेर येण्यास जाण्यास मज्जाव असणार आहे.
  • कोव्हिड रुग्ण वाढलेल्या मजल्याच्या खालील व वरील मजल्यावरील सर्व रहिवाशांना कोरोना चाचणी पाचव्या किंवा सातव्या दिवशी करावी लागेल.
  • आरटीपीसीआर टेस्ट होत नाही तोपर्यंत इमारत उघडण्यात येणार नाही किंवा अशा इमारतीस सक्तीने 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. 
  • रहिवाशी आरटीपीआर टेस्ट करत नाही तोपर्यंत इमारत उघडली जाणार नाही तर 14 कॉरन्टाईन केले जाईल.

मुंबईत झपाट्याने वाढतीय रुग्ण संख्या 

मुंबईत आज 8 हजार 82 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज दोन मृत्यूची नोंद करण्यात आलीय. याशिवाय, 622 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 51 हजार 358 वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 93 टक्क्यांवर गेलाय. मुंबईत सध्या 29 हजार 829 रुग्ण सक्रीय आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर 138 दिवसांवर पोहचलाय. मुबंईत सध्या 37 हजार 274 रुग्ण सक्रीय आहेत. 

मुंबई- ठाण्यातील ऑफलाइन शाळा झाल्या ऑफ

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई महापालिकेने इ. 10 आणि 12 वी चे वर्ग वगळता सर्व वर्गांच्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा ऑफलाइन बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ठाण्यातही शाळा बंद  करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील इ.10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग (इ. 1 ली ते इ.9 वी व 11 वी ) असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा दि. 04 जानेवारी 2022 ते दि. 31.01.2022 पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी