Mumbai Crime : मीरा रोडमध्ये भाजप महिला पदाधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 18, 2022 | 08:53 IST

मुंबई (Mumbai) पश्चिम उपनगरातील मीरा रोडमध्ये (Mira Road) भाजप महिला मोर्चा महाराष्ट्राच्या प्रदेश महिला प्रमुख सुलताना समीर खान यांच्या गाडीवर दोन अज्ञात इसमांनी रविवारी (17 जुलै) रात्री हल्ला केला. यात सुलताना यांच्या डाव्या हातावर दोन ठिकाणी जखमा झाल्या आहेत. 

Mumbai Crime
भाजप महिला पदाधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला  |  फोटो सौजन्य: Times Now

Mumbai Crime : मुंबई (Mumbai) पश्चिम उपनगरातील मीरा रोडमध्ये (Mira Road) भाजप महिला मोर्चा महाराष्ट्राच्या प्रदेश महिला प्रमुख सुलताना समीर खान यांच्या गाडीवर दोन अज्ञात इसमांनी रविवारी (17 जुलै) रात्री हल्ला केला. यात सुलताना यांच्या डाव्या हातावर दोन ठिकाणी जखमा झाल्या आहेत. 

सुलताना काल रात्री त्यांच्या पतीसोबत कारने कामानिमित्त निघाल्या होत्या. एवढ्यात मीरा रोडमधील नया नगरजवळ दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन तरुणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करत गाडीवर हल्ला केला. धारदार शस्त्राने सुलताना यांच्यावर हल्ला केल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. सुलताना यांच्या पतीने आरडाओरडा केल्याने इतर नागरिक तिथे जमा झाले आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. 

पोलिसांच्या मदतीने त्यांच्या पतीने सुलताना यांना मीरा रोडच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तिथे त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर सुलताना खान फारच घाबरल्या आहेत. त्या जबाब देण्याच्या स्थितीत नाहीत. आज तिचा जबाब नोंदवला जाईल, असं सुलताना यांच्या पतीने सांगितलं. जबाब नोंदवून घेतल्यावर आरोपींवर पुढील कारवाई केली जाईल, असं पोलीस म्हणाले. हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी अशाप्रकारे हल्ला का केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर महिलेच्या पतीने ही पक्षाची अंतर्गत बाब असल्याचा संशय व्यक्त केला आहे. 

Read Also : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू

दरम्यान, हा हल्ला सुलताना यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यातून हल्ला झाल्याचं म्हटलं जात आहे. सुलताना यांनी 4 जुलै रोजी फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. "आपल्याला मुंबईच्या पदाधिकाऱ्याकड़ून धमकी येत असल्याचा दावा सुलताना या व्हिडीओमध्ये करत आहेत. तसंच आपला पूर्वीचा व्हिडीओ कोणीतरी डिलीट केल्याचंही त्यांनी सांगितलं. "ना डरी हूं… ना डरुंगी," असं त्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत. त्यामुळे या हल्ल्यातील आरोपी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी