Mumbai Crime Branch ने केला ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; जम्मू काश्मीरहून मुंबईत आणलेला 14 कोटींचा चरस जप्त

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 27, 2021 | 21:02 IST

Mumbai Crime Branch exposes drug racket: मुंबई : मागील आठवड्यात मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने (Anti-Narcotics Squad) सायन परिसरात (Sion area) मोठी कारवाई केली होती.

14 crore charas brought from Jammu and Kashmir to Mumbai seized
जम्मू काश्मीरहून मुंबईत आणलेला 14 कोटींचा चरस जप्त  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्रात अन्य ठिकाणी देखील ड्रग्स तस्करी
  • गुप्त माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या पथकाची कारवाई
  • पोलिसांनी पकडलेल्या 24 किलो चरसची बाजारातील किंमत तब्बल 14 कोटी 44 लाख रुपये

Mumbai Crime Branch exposes drug racket: मुंबई : मागील आठवड्यात मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने (Anti-Narcotics Squad) सायन परिसरात (Sion area) मोठी कारवाई केली होती. पोलिसांनी एका ड्रग्स तस्कर (Drug Smuggler) महिलेला अटक करत तिच्याकडून तब्बल 7 किलो हिरोइन जप्त केलं  (seized 7 KG heroin) होतं.  हे प्रकरण ताजं असताना आता जम्मू काश्मीरशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने (Mumbai Crime Branch) दहिसर चेक नाक्याजवळ (Dahisar checkpoint) मोठी कारवाई करत 24 किलो चरस जप्त केले (24 KG Charas seized) आहे. 

या कारवाईत पोलिसांनी 4 जणांना अटक (4 arrested with 24 Kg of charas) देखील केली आहे. संबंधित सर्व आरोपी जम्मू काश्मिरमधून ड्रग्स आणून मुंबईत विक्री करत होते. ही टोळी मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्रात अन्य ठिकाणी देखील ड्रग्स तस्करी करत होते. मुंबई क्राइम ब्रांचच्या यूनिट 6 आणि यूनिट 7 ने ही मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या पथकाने ही कारवाई केली आहे. गेल्या महिनाभरापासून दहिसर चेक नाक्याजवळ सापळा रचून बसल्यानंतर, पोलिसांना चरस सप्लायरांना रंगेहात पकडण्यास यश आले आहे. 

पोलिसांनी पकडलेल्या 24 किलो चरसची बाजारातील किंमत तब्बल 14 कोटी 44 लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे तस्करांनी ड्रग्जची ही खेप एका सेंट्रो कारमधून श्रीनगरहून मुंबईत आणण्यात आली होती. सर्व आरोपी हे पवईचे रहिवासी आहेत. क्राइम ब्रांचची टीम गेल्या एक महिन्यापासून दहिसर येथील चेक नाक्यांवर सापळा रचून तस्करांची वाट पाहात होते. अखेर एक महिन्यानंतर, चरस तस्कर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी