मुंबई क्राइम ब्रांचने सायन परिसरात जप्त केली २१ कोटींची ७ Kg हेरोइन, महिला ड्रग्स सप्लायरला अटक

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 20, 2021 | 14:45 IST

मुंबईमध्ये ड्रग्सचं जाळे खूप पसरले असून दररोज पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. आज सकाळी मुंबई क्राईम ब्रांचच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे.

Mumbai Crime Branch seizes 7 kg heroin worth Rs 21 crore
मुंबई क्राइम ब्रांचने जप्त केली २१ कोटींची हेरोइन  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : मुंबईमध्ये ड्रग्सचं जाळे खूप पसरले असून दररोज पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. आज सकाळी मुंबई क्राईम ब्रांचच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील सायनमधून २१ कोटींचं ७ किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणातून मुंबई ड्रग्स माफियांचा अड्डा बनत चालल्याची चर्चा होत आहे. ANC च्या टीमने राजस्थानला भेट देऊन या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई पोलिसांकडून ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या हिरोइनची किंमत तब्बल 21 कोटी एवढी आहे. पोलिसांनी संबंधित ड्रग्स तस्कर महिलेला अटक करुन कसून चौकशी करत आहे.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात सुनावणी

 क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. एएनआयने एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये पोलिसांना ड्रगशी संबंधित व्हॉट्सऍप चॅट सापडले आहेत जे आर्यन खान आणि डेब्यू अभिनेत्री दरम्यान असल्याचे एनसीबीने म्हटले आहे. त्यामुळे आजच्या होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ट्विटमध्ये उल्लेख केलेल्या अभिनेत्रीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी