Mumbai Crime: प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह आढळला, लालबागमधील घटनेने खळबळ

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 15, 2023 | 08:19 IST

Decomposed body of woman found in plastic bag: मुंबईतील लालबाग परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Mumbai Crime decomposed body of woman found in plastic bag in lalbaug area
Mumbai Crime: प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह आढळला, लालबागमधील घटनेने खळबळ  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील लालबागमधील खळबळजनक घटना
  • प्लास्टिकच्या पिशवीत आढळला महिलेचा मृतदेह
  • मृतक महिलेच्या मुलीला चौकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात

Mumbai woman dead body found in plastic bag: मुंबईतील लालबाग परिसरात असलेल्या एका इमारतीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. फ्लॅटमध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लालबागमधील एका इमारतीतील पहिल्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये आढळून आला आहे. ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या भावाने पोलिसांत केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आपला तपास सुरू केला असता महिलेचा मृतदेह फ्लॅटमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत आढळून आला.

हे पण वाचा : सकाळी रिकाम्या पोटी काळा चहा पिण्याचे 5 जबरदस्त फायदे

पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी सांगितले की, महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत आढळून आला आहे. मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत होता. या प्रकरणी मृतक महिलेच्या मुलीची चौकशी सुरू आहे. मृतक महिला 53 वर्षीय आहे.

हे पण वाचा : हे 2 पदार्थ वापरा अन् मासिक पाळीच्या वेदना पळवा

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी महिलेची हत्या केली आणि त्यानंतर प्लास्टिक बॅगमध्ये मृतदेह ठेवला. ही प्लास्टिक बॅग कपाटात ठेवण्यात आली होती. या महिलेची हत्या नेमकी का करण्यात आली या संदर्भात अद्याप स्पष्टता नाहीये.

हे पण वाचा : तुम्हीही सकाळी ब्रश न करता खाता? वाचा काय आहेत त्याचे तोटे

लालबाग परिसरातील इब्राहिम कासम या इमारतीत ही घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा मृतदेह गेल्या अनेक दिवसांपासून प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून कपाटात ठेवण्यात आला असावा. कारण हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. पोलिसांना मृतक महिलेच्या मुलीवर संशय आहे. त्यामुळेच पोलिसांनी 22 वर्षीय तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी