Mumbai Crime: तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, गुप्तांगावर मेणबत्तीचे दिले चटके आणि...

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 12, 2022 | 17:11 IST

Mumbai Crime News: मुंबईतील पूर्व उपनगरात असलेल्या मुलुंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला आहे. 

Mumbai crime man made unnatural sexual relationship with 33 year old youth in mulund
Mumbai Crime: तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, गुप्तांगावर मेणबत्तीचे दिले चटके आणि... 
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील मुलुंड परिसरातील घटना
  • तरुणावर अनैसर्गिक अत्याचार
  • अत्याचार करुन गुप्तांगवर दिले मेणबत्तीचे चटके 

मुंबई : महाराष्ट्राला हादरवणारी घटना मुलुंड परिसरात (Mulund area of Mumbai) घडली आहे. एका 33 वर्षीय तरुणावर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural sexual realtion) करण्यात आले आहे. इतकेच नाही तर त्यानंतर आरोपीने या तरुणाच्या गुप्तांगावर मेणबत्तीने चटके दिल्याचंही समोर आलं आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण? 

मुंबईतील मुलुंड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका 34 वर्षीय आरोपीने 33 वर्षीय तरुणासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. आरोपीचे नाव सुरेश म्हस्के असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी सुरेश म्हस्के याने पीडित तरुणाकडून काही पैसे घेतले होते. हे पैसे देण्यास आरोपी सुरेश म्हस्के हा टाळत होता.

आपण दिलेले पैसे सुरेश देत नसल्याने पीडित तरुणाने सुरेशकडे पैशांसाठी तगादा लावला. मात्र, आपल्याकडे वारंवार पैशांची मागणी होत असल्याने आरोपी सुरेश संतापला आणि त्याने आपला राग पीडित तरुणावर काढला.

हे पण वाचा : उद्धव ठाकरेंकडून हकालपट्टी केलेल्या संतोष बांगर यांच्यावर एकनाथ शिंदेंनी दिली मोठी जबाबदारी

आरोपी सुरेश याने 6 जुलै रोजी पीडित तरुणाला मुलुंडमध्ये बोलावले. त्यानंतर त्याच्यावर तेथील एका गोडाऊनमध्ये अनैसर्गिक अत्याचार केला. अनैसर्गिक संभोग केल्यावर आरोपी तिथेच थांबला नाही. तर त्याने पीडित तरुणाच्या गुप्तांगावर मेणबत्तीचे चटके दिले. तसेच त्याच्या गुदवारांमध्ये प्लास्टिकचा पाईप देखील टाकला.

मुंबईसारख्या परिसरात अशा प्रकारची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत पीडित तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीनुसार, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलुंड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 377, 326, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी