Mumbai: आईची हत्या करुन २२ वर्षीय मुलाची धावत्या Local Train समोर उडी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 10, 2022 | 15:53 IST

Mumbai Crime News: एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या आईची हत्या करुन आपलं आयुष्य संपवण्यासाठी लोकल ट्रेनसमोर उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील मुलुंड येथे ही घटना घडली आहे.

mumbai crime news 22 year old son killed mother and then attempt to suicide by jumping infront of local train caught in cctv
Mumbai: आईची हत्या करुन २२ वर्षीय मुलाची धावत्या Local Train समोर उडी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर 
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील पूर्व उपनगर असलेल्या मुलुंड परिसरातील धक्कादायक घटना
  • आईचा गळा चिरुन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
  • धावत्या लोकल ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद 

मुंबई : मुंबईतील पूर्व उपनगरात (eastern suburb of Mumbai) असलेल्या मुलुंड (Mulund) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली आहे. आईची हत्या केल्यावर आरोपी तरुणाने स्वत: देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. या तरुणाने धावत्या लोकल ट्रेन (Mumbai local train) समोर उडी घेत आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

मुलुंडमध्ये एका २२ वर्षीय तरुणाने स्वत:च्या आईची हत्या करुन लोकल ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. छाया महेश पांचाळ असे ४६ वर्षीय मयत महिलेचे नाव आहे. छाया पांचाळ यांची हत्या त्यांचाच २२ वर्षीय मुलगा जय याने केली आहे. मुलुंडच्या वर्धमान नगरमध्ये पांचाळ कुटुंबीय रहातात. 

मुलुंड पोलिसांना या ठिकाणी त्यांचा घरातून रक्त येत असल्याचा कॉल प्राप्त झाला. यावेळी मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घर उघडून पाहताच त्यांना घरात छाया पांचाळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्या. गळा चिरलेल्या अवस्थेत छाया पांचाळ या मृत आढळल्या. यावेळी पोलिसांना एक गुजराती भाषेत घटनास्थळी चिट्ठी देखील आढळली. ही चिठ्ठी छाया यांचा मुलगा जय याने लिहिली होती.

हे पण वाचा : "थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि...." Aaditya Thackeray यांचं बंडखोरांना ओपन चॅलेंज

आत्महत्येचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद

या चिठ्ठीत त्याने आपल्या आईची हत्या केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याने मुलुंड रेल्वे स्थानकात लोकल खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा तरुण लोकलखाली उडी मारत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागलं आहे.

संपत्तीवरुन डिप्रेशनमध्ये

वडिलोपार्जित प्रॉपर्टी वरून हे दोघे माता पुत्र डिप्रेशनमध्ये असल्याचे छाया यांच्या पतीने पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तर आरोपी २२ वर्षीय तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलुंडमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी