Whatsapp Hack, महिलांशी केले धक्कादायक कृत्य

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 22, 2022 | 20:27 IST

Whatsapp Hack : अंधेरी पोलिसांनी रवी दांडू या ३० वर्षांच्या तरुणाला अटक केली. रवीवर गंभीर आरोप आहे.

Mumbai Crime News Andheri Police Arrested Man For Sending Obscene Messages And Videos To More Than 600 Women
अंधेरी पोलिसांनी रवी दांडू या ३० वर्षांच्या तरुणाला अटक केली  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अंधेरी पोलिसांनी रवी दांडू या ३० वर्षांच्या तरुणाला अटक केली
  • रवीवर गंभीर आरोप
  • आयपीसीच्या कलम ३५४ डी आणि ५०९ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल

Whatsapp Hack : व्हॉट्सअॅप अकउंट हॅक करून सहाशेपेक्षा जास्त महिलांना अश्लील मेसेज आणि अश्लील व्हिडीओ पाठवल्याप्रकरणी मुंबईच्या अंधेरी पोलिसांनी रवी दांडू या ३० वर्षांच्या तरुणाला अटक केली. महिलांशी संवाद साधण्यासाठी रवी व्हॉट्सअॅप हॅक करत होता असे पोलिसांनी सांगितले. रवी दांडू हा खासगी बँकेत डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

एका १७ वर्षांच्या मुलीने केलेल्या तक्रारीआधारे तपास करून रवी दांडू याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. रवीने तक्रारदार मुलीला एकदा फोन केला होता. खोटे कारण देऊन रवीने संबंधित मुलीकडून एका ओटीपीची माहिती घेतली आणि त्या ओटीपीद्वारे तिच्या फोनमधील डेटा हॅक केला. यानंतर संबंधित मुलीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील मुली आणि महिला यांना अश्लील मेसेज आणि अश्लील व्हिडीओ पाठवले. रवीने जानेवारी २०२२ ते जुलै २०२२ या काळात ६१० महिलांना अश्लील मेसेज पाठवले होते. पोलिसांनी आरोपीवर आयपीसीच्या कलम ३५४ डी आणि ५०९ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम १२ अंतर्गत लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पुढील पोलीस तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी