Mumbai Crime News: आंतरराष्ट्रीय बँकेची लाखोंची रोकड लुटून पळालेल्याला मुंबई पोलिसांनी बिहारमधून केली अटक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 29, 2022 | 11:36 IST

Mumbai Crime News: Driver flees with banks Rs 17 lakh to pay off personal debts : एका आंतरराष्ट्रीय बँकेची लाखोंची रोकड लुटून पळालेल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी बिहारमधून अटक करून मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात आणले. बँकेची रोकड लुटल्याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. आरोपीची चौकशी सुरू आहे.

Mumbai Crime News: Driver flees with banks Rs 17 lakh to pay off personal debts
आंतरराष्ट्रीय बँकेची लाखोंची रोकड लुटून पळालेल्याला मुंबई पोलिसांनी बिहारमधून केली अटक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आंतरराष्ट्रीय बँकेची लाखोंची रोकड लुटून पळालेल्याला मुंबई पोलिसांनी बिहारमधून केली अटक
  • आरोपीने पोलिसांकडे दिली गुन्ह्याची कबुली
  • आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी

Mumbai Crime News: Driver flees with banks Rs 17 lakh to pay off personal debts : एका आंतरराष्ट्रीय बँकेची लाखोंची रोकड लुटून पळालेल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी बिहारमधून अटक करून मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात आणले. बँकेची रोकड लुटल्याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. आरोपीची चौकशी सुरू आहे.

बँक ऑफ बहारिन अँड कुवेत (Bank of Bahrain and Kuwait) या आंतरराष्ट्रीय बँकेची १७ लाखांची रोकड घेऊन एक ड्रायव्हर पळाला. पळालेल्या ड्रायव्हरने थेट बिहारमध्ये त्याचे गाव गाठले. पोलिसांनी आरोपीला बिहारमध्ये जाऊन अटक केली. आरोपीला अटक करेपर्यंत त्याने १७ लाखांपैकी सहा लाख रुपये खर्च केले होते. उरलेले पैसे त्याच्याकडून जप्त करण्यात पोलीस यशस्वी झाले.

बँकेचे पैसे घेऊन पळालेल्या ड्रायव्हरचे नाव अनिल यादव असे आहे. त्याने गावातल्या दोनजणांकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याच्यावर प्रचंड दबाव होता. हा दबाव असह्य होत असतानाच रोख रकमेची बॅग बघून अनिल यादवने पैसे लुटण्याचा निर्णय घेतला.

बहारिनच्या दुतावासातून रोख रक्कम घेऊन बँक मॅनेजर ब्रँचमध्ये जाणार होते. यासाठी ते पैसे घेऊन कारपाशी आले. बॅग कारमध्ये ठेवली आणि दुसरं एक काम आठवल्यामुळे मॅनेजर पटकन दुतावासाच्या कार्यालयात पुन्हा गेले. काम संपवून परत आल्यावर त्यांना त्यांची कार दिसलीच नाही. मॅनेजरना बँकेने कार्यालयीन कामासाठी कार दिली होती. हीच कार चालविण्याची जबाबदारी अनिल यादव याच्याकडे होती. पैशांची बॅग बघून अनिल यादवला त्याच्यावरील कर्जभाराची आठवण झाली. झटपट कर्जातून बाहेर पडण्यासाठी अनिल यादवने पैसे लुटण्याचा निर्णय घेतला. त्याने कार घेऊन पळ काढला. पळून जाण्याआधी त्याने स्वतःचा मोबाइल बंद केला. यामुळे मॅनेजर बाहेर आले त्यावेळी त्यांना कार दिसली नाही. ड्रायव्हरला फोन करण्याचा प्रयत्न केला तर मोबाइल बंद होता. अखेर मॅनेजरने मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. 

आरोपी रोकड पळवून रेल्वेने बिहारला गेल्याचे पोलिसांना कळले. यानंतर पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन आरोपी अनिल यादव याला अटक केली. अनिलकडून पोलिसांनी रोकड जप्त केली. पण लुटलेल्या रकमेपैकी सहा लाख रुपये अनिल यादवने आधीच खर्च केले होते. कर्ज फेडून टाकणे आणि इतर खर्च यासाठी अनिल यादवने ही रक्कम वापरली. पोलिसांनी अटक केल्याचे लक्षात आल्यावर अनिल यादवने गुन्ह्याची कबुली दिली. 

अनिल यादव विरोधात आयपीसी ३८१ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. बँकेत जमा करण्यासाठी मॅनेजरने स्वतःकडे ठेवलेली रोकड लुटून पळून गेल्याचा आरोप अनिल यादववर आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपी अनिल यादव याला पोलीस कोठडी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी