Mumbai Crime: डोक्यात स्टम्प घालून कबड्डीपटूची हत्या, मुंबई हादरली

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 24, 2022 | 15:26 IST

Mumbai Kabaddi player murder: मुंबईत एका कबड्डीपटूची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Representative Image
Mumbai Crime: डोक्यात स्टम्प घालून कबड्डीपटूची हत्या, मुंबई हादरली  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील धारावीत कबड्डीपटूची हत्या
  • कबड्डीपटूच्या डोक्यात स्टम्प मारुन केली हत्या
  • दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक 

Kabaddi player murdered in Mumbai: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील धारावीत एका २६ वर्षीय कबड्डीपटूची हत्या केल्याची घटना उघडकीस झाली आहे. आरोपीने कबड्डीपटूच्या डोक्यात स्टम्प मारुन त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. (mumbai crime news kabaddi player killed with a cricket stump at dharavi area over minor issue)

मृतक कबड्डीपटूचे नाव विमल राज नाडर असे असल्याची माहिती समोर आली आहे. विमल नाडर हा धारावीत ९० फीट रोडवर असलेल्या कामराज चाळीत वास्तव्यास होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास विमल याची हत्या झाली आहे.

धारावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी सांगितले की, मृतक आणि आरोपी यांच्यात वारंवार वाद होत होते. शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आरोपी मलेश चितकंडी हा आपल्या मित्रांसोबत विमल नाडर याच्या घराजवळ बसला होता. यावेळी मलेश चितकंडी हा आपल्या मित्रांसोबत जोरजोरात गप्पा मारत होता. त्यांच्या गप्पांचा आवाज ऐकूण विमल नाडर याला जाग आली आणि त्यानंतर तो घराबाहेर आला. यावेळी विमल नाडर हा घराबाहेर असलेल्या मलेश चितकंडी आणि त्याच्या मित्रांवर भडकला.

अधिक वाचा : "विधानपरिषदेत एका पक्षाचे तीन आमदार फुटले, तीन मतांसाठी २१ कोटी" अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ

त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतका वाढला की, विमल नाडरच्या नातेवाईकांना आणि मलेश चितकंडी याच्या मित्रांना मध्यस्थी करत वाद सोडवावा लागला. या घटनेनंतर मलेश चितकंडी तेथून निघून गेला. 

अधिक वाचा : उद्धव ठाकरेंना मोठा शह देण्यासाठी राज ठाकरेंची प्रचंड मोठी खेळी, म्हणाले...

मात्र, त्यानंतर पुन्हा काळी वेळाने मलेश चितकंडी क्रिकेट स्टम्प घेऊन परत आला आणि त्याने विमल नाडर याच्या डोक्यात स्टम्पने हल्ला केला. या हल्ल्यानंतर नाडर जमिनीवर कोसळला. नाडर हा पहाटे पाच वाजेपर्यंत तेथेच पडून होता. जेव्हा स्थानिक नागरिकांनी त्याला पाहिले तेव्हा त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी सांगितले की, आम्हाला रुग्णालयातून फोन आला तेव्हा हे प्रकरण समोर आलं. आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांची टीम चितकंडी याच्या घरी पाठवली तेव्हा त्याच्या भावाने दावा केला की, तो कामावर गेला आहे. मात्र, जेव्हा घराची झडती घेतली तेव्हा तो घरातच आढळून आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी