मुंबई: Mumbai Crime: महाराष्ट्राची (Maharashtra) राजधानी मुंबईतून (Mumbai) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईत एका व्यक्तीनं पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलाच्या चेहऱ्यावर केमिकल फेकल्याची घटना घडली आहे. आपल्या पत्नीचं तिच्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यासोबत अवैध संबंध असल्याचा संशय आरोपी पतीला होता. याच संशयावरुन आरोपीनं ही घटना घडवून आणली. या घटनेत जखमी झालेल्या आई आणि मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आरोपी पतीला तात्काळ अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तर दोन वर्षांपूर्वी घरगुती वादामुळे पती-पत्नी वेगळे झाले. तेव्हापासून दोघंही वेगवेगळे राहतात. पीडित महिला एका कंपनीत सुरक्षा रक्षकाचं काम करते. त्यामुळे कंपनीतल्या एका कर्मचाऱ्याशी तिचे अवैध संबंध असल्याचा संशय तिच्या पतीला आहे. याच गोष्टीचा संशय बाळगून पतीला नेहमी राग यायचा. याच रागात आरोपी पती रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पत्नीच्या घरी पोहोचला आणि घराच दार उघडताच आई- मुलावर केमिकल फेकून तिथून फरार झाला.
पोलिसांकडून आरोपीला अटक
पतीनं केमिकल फेकताच महिलेनं आरडाओरड केली. महिलेची आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी तिच्या घरी धाव घेतली. त्यानंतर दोघांनाही तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. जिथे दोघांवर सध्या उपचार सुरु आहेत. केमिकमुळे महिलेचा चेहरा आणि छातीचा काही भाग जळाला आहे. तर मुलाच्या ओठाजवळ भाजलं आहे. घटनेसंबंधी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत आरोपीला अटक केली. आता आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे.
मुलासोबत वेगळी राहते पीडित महिला
आरोपी आणि पीडित महिलेचं लग्न झालं तेव्हा दोघांचं सर्व काही सुरळीत सुरु होतं. मात्र काही दिवसांनंतर जोरदार भांडण सुरु झाले. दोघांमध्ये वाद होऊ लागले. याच काळात दोघांना मुलगा झाला. मात्र तरीही दोघांमधील वाद काही थांबत नव्हते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. मुलगा पीडित महिलेसोबत राहत होता आणि जेव्हा ती कामावर जाते तेव्हा ती मुलाला तिच्या आजीकडे म्हणजे तिच्या आईकडे ठेवून जाते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.