Mumbai: रस्त्यावर नग्न फिरत होता व्यक्ती, पोलिसांनी हटकले तर दातांनी तोडला बोटांचा तुकडा 

Mumbai Crime News: मानसिकदृष्ट्या अवस्थ असलेल्या एका व्यक्तीने मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचे बोटाचा चावा घेऊन तुकडा पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

mumbai crime news mentally unstable man bit constable finger crime news in marathi tcrim 11
Mumbai: रस्त्यावर नग्न फिरत होता व्यक्ती, पोलिसांनी हटकले तर दातांनी तोडला बोटांचा तुकडा  

मुंबई :  मुंबईतील नागपाडा भागात एका पोलिस कॉन्स्टेबलचे बोट एका व्यक्तीने दातांनी तोडल्याची विचित्र घटना घडली.  सांगितले जात आहे की आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव मोहम्मद शकील शब्बीर हुसैन सलमानी आहे. सध्या पोलीस त्याचे मानसिक आरोग्याची तपासणी करत आहे. 

सलमानी यांच्या कुटुंबियांनी पोलिसांनी सांगितले की, तो बऱ्याच काळापासून मानसिक आजाराने त्रस्त आहे. जखमी कॉन्स्टेबलला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तुटलेल्या बोटाला जोडणे शक्य नसल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. आरोपीने बोट इतक्या जोरात चावले की बोटाचे दोन तुकडे केले. 

ही घटना बुधवारी सायंकाळी नागपाडा भागात घडली. जनार्दन सकरे असे जखमी झालेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो नागपाडा पोलीस ठाण्याच्या पेट्रोलिंगच्या गाडीवर होता. त्यावेळी काही लोकांनी त्या ठिकाणी येऊन त्याची तक्रार केली. की एक व्यक्ती नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरतो आहे. तसेच तो येणाऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देत आहे. 

कॉन्स्टेबल त्या व्यक्तीकडे गेला आणि त्याला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला रस्त्यावरून दूर जाण्यास सांगितले. सलमानीने पोलिसाचे एक म्हणणे ऐकले नाही. उलटे त्यालाच शिव्या द्यायला लागला आणि रस्ता ब्लॉक केला. यावेळी पोलीस त्याच्या जवळ गेल्यावर त्याने डाव्या हाताचे बोट पकडले आणि त्याचा जोरदार चावा घेतला. 

कुटुंबियांनी सांगितले, की सलमानीचा ठाण्याच्या मेंटल हॉस्पीटलमध्ये इलाज सुरू आहे. त्याच्या या स्वभावामुळे त्याची बायकोही त्याला सोडून गेली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...