प्रियकराबरोबर करत होती सेक्स, तेव्हाच आला पती... रागाच्या भरात पत्नीनेच केले नवऱ्याचे ४ तुकडे, गाडले किचनमध्ये

मुंबई
Updated Jun 03, 2021 | 17:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai Crime News: हे हत्याकांड तेव्हा उघड झाले जेव्हा रईसचा भाऊ त्याच्या शोधात दहिसरस्थित त्याच्या घरी आला. याच दरम्यान संधी साधून मुलीने काकाला सर्वकाही सांगितले.

Murder at Dahisar
पत्नीने प्रियकरासोबत केला नवऱ्याचा खून 

थोडं पण कामाचं

  • पत्नीने प्रियकरासोबत केला नवऱ्याचा खून
  • पतीच्या मृतदेहाचे ४ तुकडे करून किचनमध्येच गाडले
  • सहा वर्षांच्या मुलीने सांगितले सत्य

मुंबई : मुंबईतील  दहिसर (Dahisar) परिसरात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. सहा वर्षांच्या लहान मुलीकडून एक हत्याकांड (Murder at Dahisar) उघड झाले आहे. मुलीने (Little girl gives statement to police) पोलिसांना सांगितले की तिच्या डोळ्यासमोरच आपल्या आईने तिच्या प्रियकरासोबत तिच्या नवऱ्याचा खून (Wife killed husband with help of lover) केला आहे. ही माहिती पोलिसांना खूनाच्या ११ दिवसांनंतर सह वर्षांच्या निरागस मुलीने दिली आहे. या लहान मुलीकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी (Mumbai) (Mumbai Police) आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनाही अटक केली आहे. नवऱ्याचा खून करून पत्नीने त्याचा मृतदेह स्वयंपाकघरातच गाडला (Dead Body buried in Kitchen) होता. सध्या पोलिसांनी त्या मृतदेहाला ताब्यात घेतले आहे. (Mumbai Crime News: Wife Murdered husband with help of Lover & buried dead body in kitchen)

गोंडा येथे लग्न, मुंबईत खून


रईसचे लग्न उत्तर प्रदेशातील गोंडा येथे २०१२मध्ये शाहिदाबरोबर झाले होते. लग्नानंतर ते दोघेही मुंबईतील दहिसर पूर्व येथे खान कंपाउंडमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होते. रईस दहिसर येथे रेल्वे स्टेशनजवळच एका कपड्याच्या दुकानात नोकरी करत होता. तर त्याची पत्नी शाहिदा ही ६ वर्षांची मुलगी आणि अडीच वर्षांचा मुलगा यांच्यासह घरीच असायची. याच दरम्यान शाहिदाच्या शेजारी राहणारा अनिकेत उर्फ अमित मिश्रा यांच्यात संबंध तयार झाले. त्या दोघांमध्येही अनैतिक संबंध सुरू झाले. ही गोष्ट रईसच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यात आणि शाहिदात भांडण झाले. रईसकडून वारंवार शाहिदाला समजल्यावरदेखील शाहिदा अमित मिश्राबरोबरचे अनैतिक संबंध संपवण्यास तयार नव्हती. वारंवार भांडणे व्हायला लागल्यानंतर शाहिदाने आपला प्रियकर अनिकेत उर्फ अमित मिश्रा याच्यासोबत मिळून रईसला संपवण्याचा प्लॅन बनवण्यास सुरूवात केली.

प्रियकरासोबत सेक्स करत असताना केला नवऱ्याचा खून


अकरा दिवसांआधी शाहिदा आणि अमित जेव्हा सेक्स करत होते, तेव्हा अचानक रईस घरी आला. त्यावेळेस संधी साधून शाहिदा आणि अमितने घरात ठेवलेल्या चाकूने रईसचा गळा कापला. त्याचदरम्यान रईसची सहा वर्षांची मुलगी आपल्या अडीच वर्षाच्या भावासोबत घरी आली. त्या निरागस मुलीने हा सर्व प्रकार पाहिला. शाहिदाने आपल्या मुलीला धमकावले आणि दम दिला की जर तिने याबद्दल कोणालाही काहीही सांगितले तर ती तिलादेखील तिच्या वडिलांप्रमाणेच कापून जमिनीत गाडून टाकेल. शाहिदाने रईसचा खून करून आपल्या प्रियकराच्या मदतीने रईसच्या मृतदेहाचे ४ तुकडे करून त्याला स्वयंपाकघरात गाडले होते. रईसचा फोन शाहिदाने स्वत:जवळच ठेवला होता. रईसच्या घरच्यांचा फोन आल्यावर शाहिदा त्यांना सांगायची की रईस न सांगताच कुठेतरी निघून गेला आहे. 

रईस गायब झाल्याने वाढला संशय


शाहिदा आणि तिचा प्रियकर अमित रईसचा खून लपवण्यासाठी प्रयत्न करत होते. तर रईस अचानक गायब झाल्याची गोष्ट रईसच्या मित्रांना पटत नव्हती. याचदरम्यान रईसच्या एका मित्राने दहिसर पोलिस स्टेशनमध्ये रईस गायब झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. दरम्यान रईसच्या सहा वर्षांच्या निरागस मुलीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी रईसचा मृतदेहदेखील ताब्यात घेतला आहे. शाहिदानेदेखील आपल्या गुन्ह्याची कबूली दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी