Mumbai Local Train मुंबईः एका दिवसात लोकलच्या २ लाख तिकिटांची विक्री

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 02, 2021 | 15:34 IST

ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसचा दुसरा डोस घेऊन किमान १४ दिवस झाले आहेत अशांना लोकल प्रवासाच्या दैनंदिन तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. ही प्रक्रिया रविवार ३१ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी रविवार असूनही लोकलच्या दोन लाखांपेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली.

Mumbai: Daily ticket sales for local trains cross 2L on Day 1
मुंबईः एका दिवसात लोकलच्या २ लाख तिकिटांची विक्री  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • मुंबईः एका दिवसात लोकलच्या २ लाख तिकिटांची विक्री
  • पश्चिम रेल्वे मार्गावर ८३ हजार आणि मध्य रेल्वे मार्गावर १ लाख २८ हजार तिकिटांची विक्री
  • लसचा दुसरा डोस घेऊन किमान १४ दिवस झालेल्यांना तिकीट

Mumbai: Daily ticket sales for local trains cross 2L on Day 1 । मुंबईः ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसचा दुसरा डोस घेऊन किमान १४ दिवस झाले आहेत अशांना लोकल प्रवासाच्या दैनंदिन तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. ही प्रक्रिया रविवार ३१ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी रविवार असूनही लोकलच्या दोन लाखांपेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली. पश्चिम रेल्वे मार्गावर ८३ हजार आणि मध्य रेल्वे मार्गावर १ लाख २८ हजार तिकिटांची विक्री झाली. 

सध्या अठरा किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या तसेच कोरोना प्रतिबंधक लसचा दुसरा डोस घेऊन किमान १४ दिवस झालेल्यांना लोकल प्रवासाचे तिकीट खरेदी करण्याची परवानगी आहे. ज्यांचे वय अठरापेक्षा कमी आहे पण लोकलमधून प्रवास करायचा आहे अशा मुलांना त्यांचे शाळा किंवा कॉलेजचे ओळखपत्र दाखवून लोकलचे तिकीट खरेदी करण्याची परवानगी आहे. देशात अद्याप अठरापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी लसीकरण सुरू झालेले नाही. पण अनेक शाळा-कॉलेज सुरू आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुलांसाठी लोकल तिकिटाचा वेगळा नियम करण्यात आला आहे. 

कोरोना संकट नियंत्रणात येऊ लागले आहे. यामुळे पुढील काही दिवसांत लोकलच्या दैनंदिन तिकिटांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या सुटीमुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिकिटांची विक्री मोठ्या प्रमाणावर होणार नाही पण नंतर तिकीट विक्रीचे प्रमाण वाढेल, असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला. 

प्रवाशांनी त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी कोरोना असो वा नसो मास्क घालून रेल्वे परिसरात वावरावे आणि लोकल प्रवासातही मास्क घालावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत मुंबईत १ कोटी ४७ लाख ५१ हजार ४७७ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. मुंबईमध्ये ९१ लाख ३७ हजार १६१ नागरिकांना लसचा पहिला डोस तर ५६ लाख १४ हजार ३१६ जणांना दुसरा डोस टोचण्यात आला आहे.

Local Ticket: लोकलचा प्रवास करण्यासाठी आता पास नाही तर मिळेल थेट तिकीट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी