मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील साकीनाका (Sakinaka Mumbai) परिसरात एका २३ वर्षीय व्यक्तीचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत (decomposed body of man found) आढळून आला आहे. तर मृतक व्यक्तीची पत्नी घरात नसून फरार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच पोलिसांनाही मृतकाच्या पत्नीवर संशय असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून मृतक इसमाच्या पत्नीचा शोध सुरू आहे.
साकीनाका येथील एका चाळीतील खोलीत कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे. तर मृतकाच्या वडिलांनी आपल्या सुनेबाबत सांगितले की, ते जेव्हा-जेव्हा आपल्या मुलाला फोन करत असत त्यावेळी त्यांची सुन फोन उचलत असे आणि सांगायची की पती आजारी आहे. ताप आल्यामुळे ते झोपले आहेत असंही ती सांगायची. मी सुनेवर विश्वास ठेवायचो आणि त्यामुळे मुलासोबत माझं बोलणं होत नव्हतं.
हे पण वाचा : 'वर्षभरापूर्वीच शिवसेना-भाजप युतीबाबत उद्धव ठाकरेंची मोदींसोबत तासभर झालेली चर्चा', शेवाळेंचा गौप्यस्फोट
मृतक इसमाचं नाव नसीम खान असल्याची माहिती समोर आली आहे. साकीनाका परिसरातील खैरानी रोड येथील सरोवर चाळीत आपली पत्नी रुबीना सोबत नसीम खान राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीतील नागरिकांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घराचा दरवाचा तोडण्यात आला आणि मग या प्रकरणाचा उलगडा झाला.
पोलिसांनी नसीम खान याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचं नेमकं कारण काय आहे याबाबत माहिती समोर येईल. नसीम खान याच्या वडिलांना या घटनेबाबत माहिती दिली असून मृतकाची ओळख पटवण्यासाठी त्यांना बोलावण्यात आलं आहे.
नसीम खान हा टेलरचं काम करत असे. त्याचं लग्न रूबीना हिच्यासोबत २०१७ मध्ये झालं होतं. काही दिवसांपूर्वीच नसीम आणि रूबीना हे सरोवर चाळीत शिफ्ट झाले होते. नसीम याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता मात्र, नंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. अनेकदा या दोघांतील वाद सोडवण्यासाठी शेजारील नागरिक मध्यस्थी करत होते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.