कांदिवलीच्या बिल्डरचे पैसे चोरुन पळालेल्याला अटक, 27 लाखांची रोकड आणि बाईक जप्त

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 09, 2023 | 10:57 IST

Mumbai : Driver fleeswith Rs 35 lakh cash and bike of Kandivli developer held from Kalyan : मुंबईतील कांदिवलीच्या बिल्डरचे पैसे चोरुन पळालेल्याला कल्याण फाटा येथून अटक करण्यात आली.

Mumbai : Driver fleeswith Rs 35 lakh cash and bike of Kandivli developer held from Kalyan
कांदिवलीच्या बिल्डरचे पैसे चोरुन पळालेल्याला अटक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कांदिवलीच्या बिल्डरचे पैसे चोरुन पळालेल्याला अटक
  • 27 लाखांची रोकड आणि बाईक जप्त
  • कांदिवलीच्या पोलिसांनी दिली कारवाईची माहिती

Mumbai : Driver fleeswith Rs 35 lakh cash and bike of Kandivli developer held from Kalyan : मुंबईतील कांदिवलीच्या बिल्डरचे पैसे चोरुन पळालेल्याला कल्याण फाटा येथून अटक करण्यात आली. अटक केलेल्या व्यक्तीकडून 27 लाख रुपये रोख रक्कम आणि एक बाईक जप्त करण्यात आली. पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीचे नाव पंकज सिंह असून तो 35 वर्षांचा आहे.

Makar Sankranti : यंदा कधी आहे भोगी, मकरसंक्रांती आणि किंक्रांत?

Angarki Sankashti Chaturthi 2023 : गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी, 10 जानेवारीला अंगारकी संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी, चंद्रोदय वेळ

पंकज सिंह मूळचा उत्तर प्रदेशमधील जौनपूरचा रहिवासी आहे. मुंबईतील कांदिवलीच्या बिल्डरने गुजरातमध्ये एक भूखंड खरेदी केला. या भूखंडाच्या व्यवहारासाठी बिल्डरला 35 लाख रुपये रोख रकमेच्या स्वरुपात भूखंड मालकाला द्यायचे होते. बिल्डरच्यावतीने ही रक्कम घेऊन योगेश गुजरातला गेला होता. योगेश हा बिल्डर सोबत दहा वर्षांपासून व्यवस्थित काम करत होता. याच कारणामुळे बिल्डरने योगेशकडे व्यवहारासाठीचे पैसे आणि एक बाईक सोपविली होती. पण योगेशला बाईक चालवता येत नव्हती. यामुळे बिल्डरने पंकज सिंह याला बाईक चालविण्यासाठी पैसे दिले होते. पंकज आणि योगेश बाईकने गुजरातमध्ये जाणार होते. तिथे योगेश रोख रक्कम देऊन ठरवलेला व्यवहार करणार होता. यानंतर दोघेही बाईकने परत येणार होते. पण आयत्यावेळी एक अनपेक्षित घटना घडली.

ज्या ठिकाणी व्यवहार करायचा होता त्या इमारतीत योगेश पोहोचला. संबंधित इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने स्वतःची नोंदणी करा नंतर आत जा असे सांगितले. योगेश सुरक्षा रक्षकाकडे असलेल्या नोंदवहीत स्वतःची माहिती नोंदवत होता, त्याचवेळी पंकज बाईक आणि रोख रक्कम घेऊन पळाला. योगेशने लगेच फोन करुन ही माहिती बिल्डरला दिली. बिल्डरने तातडीने पोलिसांना कळवले. पोलीस यंत्रणा सक्रीय झाली. 

बाईकवरुन रोख रक्कम घेऊन पळालेल्या पंकजला पकडण्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील निवडक नाक्यांवरच्या पोलिसांना सावध केले. सावध असलेल्या पोलिसांनी रविवार 8 जानेवारी 2023 रोजी कल्याण नाका येथून पंकजला अटक केले.

पोलिसांनी अटक केलेल्या पंकजकडून 27 लाख रुपये रोख रक्कम आणि एक बाईक जप्त केली. पंकज मुंबईत ज्यांच्यासोबत वास्तव्यास होता त्यांची पण चौकशी सुरू आहे. पोलीस पंकजची सखोल चौकशी करत आहेत. 

पंकजने बाईक मालाडमध्ये एका ठिकाणी ठेवली होती. पोलिसांनी ही बाईक जप्त केली. बिल्डरने 35 लाख रुपये दिले असताना पंकजकडे 27 लाख रुपयेच आढळले आहेत. उरलेल्या रकमेचे त्याने काय केले हे जाणून घेण्यासाठी पोलीस चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी