Mumbai नजीक औषध कंपनीच्या आडून चालायची ड्रग्जची फॅक्टर, ॲपच्या माध्यमातून पॅडलर करायचे सप्लाय

Mephedrone Seized : मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने एका मोठ्या ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला असून, येथून 1403 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1403 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Mumbai: Drugs worth 1403 crores were caught from the drug factory, supply was done through the app
औषध कंपनीच्या आडून ड्रग्जचा धंदा, ॲपच्या माध्यमातून कस्टमरला होत होता सप्लाय  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांच्या कारखान्याचा पर्दाफाश केला
  • 1403 कोटींच्या अमली पदार्थांसह आरोपींना अटक
  • औषध कारखान्याच्या नावाखाली ड्रग्जचा धंदा सुरू होता

मुंबई : मुंबई नजीक ड्रग्जच्या एका मोठ्या कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. येथून 1403 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागातील एका अमली पदार्थाच्या कारखान्यावर मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने छापा टाकला. येथून पोलिसांनी 703 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1403 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. (Mumbai: Drugs worth 1403 crores were caught from the drug factory, supply was done through the app)

अधिक वाचा : खंडणीसाठी १३ वर्षांच्या मुलाचे अपहरण आणि हत्या; अफझल आणि इमरानला अटक

पोलिसांनी मुख्य पुरवठादारासह 5 ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी मुंबई आणि अनेक भागात अनेक सोशल मीडिया अॅप्सद्वारे ड्रग्जचा पुरवठा करत असे. औषध कारखान्याच्या नावाखाली ड्रग्जचा कारखाना चालवला जात होता.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर 

अंमली पदार्थ विरोधी सेलचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितले की, पहिल्या आरोपीच्या चौकशीत असे आढळून आले की, मुंबईपासून ६० किमी अंतरावर असलेल्या एका फार्मास्युटिकल फॅक्टरीच्या नावाखाली ड्रग्ज बनवून त्याचा पुरवठा केला जात आहे. खरं तर, 29 मार्च 2022 रोजी अंमली पदार्थ विरोधी सेलने 250 ग्रॅम ड्रग्जसह एका पॅडलरला अटक केली होती. या चौकशीत मुंबई पोलिसांना नालासोपाऱ्यातील ड्रग्ज फॅक्टरीचे दुवे सापडले. या दुव्याचा तपास करत पोलीस पथकाने नालासोपारा येथील औषधाच्या फॅक्टरीवर छापा टाकला आणि तेथून 1403 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त करताना मुख्य पुरवठादार प्रेमकुमार सिंग याला अटक केली. त्याच्या सांगण्यावरून आणखी तीन आरोपींना पोलिसांनी नंतर अटक केली.

अधिक वाचा : Maharashtra: फडणवीसांची तातडीची दिल्लीवारी, शिंदे मात्र राहिलेत घरी

मुख्य आरोपी केमेस्‍ट्री जाणकार 

आरोपींच्या चौकशीत ऑपरेंडीचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा औषध कारखाना एका औषध कंपनीच्या नावाखाली चालवला जात होता. मुख्य पुरवठादार प्रेमकुमार सिंग यांना केमेस्‍ट्रीचे चांगले ज्ञान होते. याचा फायदा घेत तो कारखान्यात स्वतः ड्रग्ज बनवत असे आणि सोशल मीडिया ॲपचा वापर करून त्याचा पुरवठा करायचा. ड्रग्ज पॅडलर सोशल मीडिया ॲपद्वारे त्याच्याशी संपर्क साधायचे. या पॅडलर्सच्या माध्यमातून मुंबई आणि आसपासच्या परिसरात ड्रग्जचा पुरवठा केला जात होता. गेल्या अनेक महिन्यांपासून हा पुरवठा सुरू होता. या अमली पदार्थाच्या तस्करीचा अंडरवर्ल्ड किंवा बॉलिवूड जगताशी काही संबंध आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आता मुंबई पोलीस करत आहेत. अँटी-नॉर्कोटिक्स सेलनेही या दिशेने तपास सुरू केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण रॅकेटच्या लिंकपर्यंत पोहोचण्यात व्यस्त आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी