Kirit Somaiya : किरीट सोमय्या तोंडघशी, किशोरी पेडणेकर यांना समन्स दिले नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण

Kirit Somaiya : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एसआरए घोटाळा केला आहे असा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच पेडणेकर यांना दादर पोलिसांनी समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते, परंतु पेडणेकर हजर राहिल्या नाहीत असा दावाही सोमय्या यांनी केला होता. परंतु पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांना समन्स बजावलेच नव्हते असे स्पष्टीकरण दिले आहे.

kirit somaiya
किरीट सोमय्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एसआरए घोटाळा केला आहे
  • असा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.
  • तसेच पेडणेकर यांना दादर पोलिसांनी समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते, परंतु पेडणेकर हजर राहिल्या नाहीत असा दावाही सोमय्या यांनी केला होता.

Kirit Somaiya : मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एसआरए घोटाळा केला आहे असा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच पेडणेकर यांना दादर पोलिसांनी समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते, परंतु पेडणेकर हजर राहिल्या नाहीत असा दावाही सोमय्या यांनी केला होता. परंतु पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांना समन्स बजावलेच नव्हते असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे सोमय्या यांचा दावा खोटा ठरला असून ते तोंडघशी पडले आहेत. (mumbai ex mayor kishori pednekar didnt summoned dadar police clarify after bjp leader kirit somaiya allegation)

अधिक वाचा :  Crime | 'ती'एक पोस्ट टाकणे पडले महागात..?, राहुरी कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्याला अटक

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे की लोवर परळ येथील गोमाता जनता एसआरए कोऑपरेटिव्ह सोसायटीत किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केला आहे. पेडणेकर यांनी या जागेची कागदपत्रे आपल्या दिवंगत बंधू सुनील कदम यांच्या नावे केली आहेत असे सोमय्या म्हणाले होते. या प्रकरणी दादर, निर्मल नगर आणि मरील लाईन्स पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाकडे चौकशी सुरू असून या घोटाळ्याविरोधात वाणिज्य मंत्रालयाने सेशन कोर्टातही धाव घेतल्याचे सोमय्या यांनी सांगितले. माजी महापौर किशोरी पेडणकेर यांच्या विरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकर यांची चौकशी करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. तसेच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही चौकशीची मागणी केल्याचे सोमय्या यांनी नमूद केले आहे. 


अधिक वाचा :  डॉक्टर आत्ता औषधं लिहून देणार मराठीतून; MBBS,BDSचं शिक्षण होणार मराठी भाषेत

दुसरीकडे किशोरी पेडणेकर यांनी सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सोमय्या हे चार्टड अकाऊंटंट आहेत, कुठलेही आरोप करण्यापूर्वी त्यांनी पुरावे द्यावे असे पेडणेकर म्हणाल्या आहेत. सोमय्या यांनी जे आरोप केले आहेत त्यापैकी ६ गाळ्यांना मी भेट दिली आहे, त्या गाळे मालकांनीही हे आरोप फेटाळून लावले आहेत. जर हे गाळे माझ्या मालकीचे असतील तर त्यांनी मी टाळे ठोकेन असे पेडणेकर म्हणाल्या. मी त्यांच्यासमोर झुकत नाही म्हणून दबाव आणला जात आहे, मुंबई उच्च न्यायालयात सर्व पुरावे सादर केल्याचेही पेडणेकर यांनी नमूद केले आहे. 

अधिक वाचा :  TATA Airbus प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले!, नेमकं काय म्हणाले?

किशोरी पेडणेकर यांना समन्स नाही - पोलीस

29 ऑक्टोबर रोजी किशोरी पेडणेकर यांना दादर पोलिसांत हजेरी लावावी लागणार असा दावा सोमय्या यांनी केला होता. परंतु पोलिसांनी पेडणेकर यांना कुठल्याच प्रकारे समन्स बजावले नसल्याचे स्पष्ट केले आहे. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार दादर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक महेश मुगुतराव यांनी पेडणेकर यांना कुठल्याही घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले नसल्याचे म्हटले आहे. पेडणेकर गेल्या आठवड्यात आधीच चौकशीसाठी हजर झाले होते, तसेच पेडणेकर यांनी त्यांच्या समर्थनार्थ  पुरावेही सादर केले होते, त्यांना आता कुठलेही समन्स बजावले नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी