Governor Bhagat Singh Koshyari : मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढले तर पैसेच नाही उरणार, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त विधान 

राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. मुंबईला आर्थिक राजधानी करण्यात गुजराती आणि राजस्थानी समाजाचा सिंहाचा वाटा आहे, हे लोक मुंबईतून बाहेर  पडल्यास मुंबई आणि ठाण्यात पैसेच उरणार नाही असे कोश्यारी म्हणाले आहेत. त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.

थोडं पण कामाचं
  • राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.
  • मुंबईला आर्थिक राजधानी करण्यात गुजराती आणि राजस्थानी समाजाचा सिंहाचा वाटा आहे, हे लोक मुंबईतून बाहेर  पडल्यास मुंबई आणि ठाण्यात पैसेच उरणार नाही
  • असे कोश्यारी म्हणाले आहेत. त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.

Governor Bhagat Singh Koshyari : मुंबई : राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी एक वादग्रस्त विधान (Controversial Statement) केले आहे. मुंबईला (Mumbai) आर्थिक राजधानी (Financial Captila) करण्यात गुजराती (Gujrati) आणि राजस्थानी (Rajsthan) समाजाचा सिंहाचा वाटा आहे, हे लोक मुंबईतून बाहेर  पडल्यास मुंबई आणि ठाण्यात (Thane) पैसेच उरणार नाही असे कोश्यारी म्हणाले आहेत. त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.

अधिक वाचा :  धक्कादायक ! मलकापूरचा भोंदू महाराज विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकला, प्रसादात गुंगीचे औषध देत महिलेवर केला बलात्कार, वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

शुक्रवारी अंधेरी येथील एका चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. तेव्हा कोश्यारी म्हणाले की, मी नेहमी महाराष्टात सांगतो की आज मुंबई किंवा ठाण्यात गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढा तर एक रुपया उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी होण्यात गुजराती आणि राजस्थानी लोकांचा सिंहाचा वाटा आहे असे कोश्यारी म्हणाले. कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. 

अधिक वाचा : Shiv Sena: शिंदे गटात जाणार की नाही याचा निर्णय उद्या सांगेन: अर्जुन खोतकर

मुख्यमंत्री शिंदे तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे का ?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोश्यारी यांचा व्हिडीओ ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे का? असा सवाल केला आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे... 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता..मुख्यमंत्री शिंदे ...ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे.. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा..दिल्ली पुढे किती झुकताय? असेही राऊत म्हणाले आहेत. 

राष्ट्रवादीचा आक्षेप

राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल यांच्यावर टीका केली आहे. मिटकरी म्हणाले की कोश्यारी नेहमीच वादग्रस्त विधान करतात. कोश्यारी यांनी आधी महाराष्ट्राचा इतिहास आधी नीट वाचावा, कोश्यारी यांनी उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहार जरी महाराष्ट्रात आणला तरी महाराष्ट्रातला मराठी माणूसच संपूर्ण भारताला पोसणार आहे, तसेच कोश्यारी यांनी माफी मागावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही मिटकरी यांनी दिला आहे. 

अधिक वाचा : Sanjay Raut : महिलेला ७० सेकंदात २८ शिव्या, संजय राऊत यांची धक्कादायक ऑडिओ टेप?
 

अधिक वाचा : ठाकरेंच्या घरात भूकंप, काकांना सोडून पुतणे शिंदेंच्या तंबूत!


रामदास स्वामींशिवाय छत्रपतींना कोण विचारणार 

वादग्रस्त विधान करण्याची कोश्यारी यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी कोश्यारी यांनी रामदास स्वामी हेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू आहेत असे विधान केले होते. तसेच रामदास स्वामी नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी विचारले नसते असेही कोश्यारी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आपल्याला हे माहित नव्हतं, या पुढे माहिती घेऊन वक्तव्य करू अशी सारवासारव कोश्यारी यांनी केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी