मुंबईत प्राईम मॉलला आग

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 19, 2021 | 14:35 IST

Mumbai: Fire at Prime Mall in Vile Parle West; 12 fire engines on spot to douse the flames मुंबईच्या पश्चिम उपनगरातील विलेपार्ले येथे असलेल्या प्राईम मॉलला सकाळी अकराच्या सुमारास आग लागली.

Mumbai: Fire at Prime Mall in Vile Parle West; 12 fire engines on spot to douse the flames
मुंबईत प्राईम मॉलला आग 
थोडं पण कामाचं
  • मुंबईत प्राईम मॉलला आग
  • विलेपार्ले येथे असलेल्या प्राईम मॉलला सकाळी अकराच्या सुमारास आग लागली
  • अग्नीशमन दलाच्या १२ बंबगाड्या पोहोचल्या

Mumbai: Fire at Prime Mall in Vile Parle West; 12 fire engines on spot to douse the flames मुंबईः मुंबईच्या पश्चिम उपनगरातील विलेपार्ले येथे असलेल्या प्राईम मॉलला सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. आगीचे स्वरुप मोठे असल्यामुळे घटनास्थळी तातडीने अग्नीशमन दलाच्या १२ बंबगाड्या पोहोचल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली. दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही मात्र वित्तहानी झाली आहे. 

डिसेंबर २०११ मध्ये प्राईम मॉलच्या चौथ्या मजल्यावरील एका दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. दोन तासांत ही आग आटोक्यात आली होती. यानंतर आज (शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१) प्राईम मॉलला आग लागली.

मॉलमध्ये असलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. कोणीही बेपत्ता असल्याची तक्रार आलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून इरला मार्केट बंद करण्यात आले आहे. मॉलच्या आसपास असलेल्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.

मुंबईत आग लागण्याची सात दिवसांतील ही तिसरी घटना आहे. याआधी पवईत एका कारच्या शोरूमला आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला आग लागल्याची घटना घडली. दोन्ही घटनांमध्ये वित्तहानी झाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी