[VIDEO]: ताज हॉटेलजवळील इमारतीला आग, आगीत होरपळून एकाचा मृत्यू

मुंबई
Updated Jul 21, 2019 | 15:29 IST

Mumbai Fire: मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलजवळील एका इमारतीला आग लागली आहे. या इमारतीत काही नागरिक अडकले होते त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं. मात्र, दुर्दैवाने एका व्यक्तीचा आगीत होरपळून मृत्यू झाला

Churchill Chamber building fire
कुलाबा हॉटेलजवल इमारतीला आग  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • ताज हॉटेलजवळ इमारतीला आग
  • आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
  • आगीत होरपळून एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईतील कुलाबा येथे चर्चिल चेंबर नावाच्या इमारतीला दुपारच्या सुमारास आग लागली होती. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. या इमारतीत काही नागरिक अडकले होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं तसेच इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. मात्र, या आगीत दुर्दैवाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. इमारतीला लागलेल्या आगीमुळे प्रचंड धुर होता आणि या धुरामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. चर्चिल चेंबर ही इमारत ताज हॉटेलजवळ असून ही खूप जुनी इमारत असल्याची माहिती समोर येत आहे. चर्चिल चेंबर ही चार मजल्यांची इमारत असून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. 

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचं वृत्त समोर येत आहे. आग लागल्यानंतर तात्काळ इमारत रिकामी करण्यात आली होती. मात्र, तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पोट माळ्यावर काही जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांकडून अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि सर्वांना बाहेर काढलं. त्यानंतर त्यांना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


मुंबईत दुर्घटना सुरूच 

गेल्या आठवड्यात मुंबईतील डोंगरी परिसरात एका इमारतीचा अर्धा भाग कोसळला होता. चार मजली इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले होते. कोसळलेली ही इमारत खूपच जुनी होती आणि त्या इमारतीत जवळपास १५ कुटुंब राहत होती. कोसळलेल्या या इमारतीचं नाव केसरबाई असं होतं. सुरुवातीला माहिती समोर आली होती की, ही इमारत म्हाडाची आहे. मात्र नंतर म्हाडाने स्पष्टीकरण देत ही इमारत म्हाडाची नसून तर अनधिकृत होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
[VIDEO]: ताज हॉटेलजवळील इमारतीला आग, आगीत होरपळून एकाचा मृत्यू Description: Mumbai Fire: मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलजवळील एका इमारतीला आग लागली आहे. या इमारतीत काही नागरिक अडकले होते त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं. मात्र, दुर्दैवाने एका व्यक्तीचा आगीत होरपळून मृत्यू झाला
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...