Mumbai Fire: मुंबईतील निवासी इमारतीत भीषण आग लागली, जीव वाचवण्यासाठी एकाने मारली इमारतीवरून उडी [video]

Fire breaks out in Parel's building :  मुंबईतील परळ परिसरातील एका निवासी इमारतीत मोठी आग लागली. इमारतीतील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे सांगितले जात आहे की ही आग अविघ्नच्या अपार्टमेंटमध्ये लागली.

Mumbai building Fire: Fire On 19th Floor Of Luxury Residential Tower In South Mumbai 1 Dead
Mumbai Fire: मुंबईतील निवासी इमारतीत भीषण आग लागली  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील परळ परिसरातील एका निवासी इमारतीत मोठी आग लागली
  • ली. इमारतीतील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
  • ही आग अविघ्नच्या अपार्टमेंटमध्ये लागली.

Mumbai fire । मुंबई : मुंबईतील परळ परिसरातील एका निवासी इमारतीत भीषण आग लागली. वन अविघ्न पार्क (avighna tower fire) इमारतीतील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे सांगितले जात आहे की ही आग वन अविघ्नच्या अपार्टमेंटमध्ये लागली.  करीरोडला (curry road building fire) असलेल्या या इमारतीत  अनेक हाय प्रोफाइल लोक आणि व्यापारी राहतात. या आगीत जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही आहे. जवळपासच्या भागातून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीत किती लोक अडकले आहेत हे अद्याप कळू शकलेले नाही. ज्या इमारतीत आग लागली ती 60 मजली आहे. आगीची पातळी लेव्हल -4 म्हणून नोंदवली गेली आहे. आगीची ही पातळी बरीच गंभीर मानली जाते.

, ,

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली - बिल्डर

या इमारतीचे बिल्डर कैलाश अग्रवाल यांनी टाइम्स नाऊला सांगितले की, इमारतीत राहणाऱ्या सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. इमारतीत 400 लोक राहतात. ते म्हणाले, “इमारतीमध्ये अग्निशमन पुरेशी उपकरणे आहेत जी नॉर्वेकडून आणली गेली आहेत. नुकतीच फायर ड्रिल करण्यात आली. अग्रवाल यांनी सांगितले की, आग शॉर्टसर्किटमुळे लागली.

अनेक किलोमीटर दूरून  दिसतो धूर

आग इतकी भीषण आहे की इमारतीतून निघणारा धूर कित्येक किलोमीटर दूरून दिसतो. ही इमारत रहिवासी असल्याने लोक इमारतीत अडकण्याची शक्यता आहे. इमारतीच्या 19 व्या मजल्यावर आग लागली.

आग कशी लागली हे कळू शकले नाही

या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये ही आग कशी लागली याची माहिती अद्याप उपलब्ध नाही. जो व्हिडिओसमोर आला आहे त्यात एक व्यक्ती19 व्या मजल्यावरून 18 व्या मजल्यावर उडी मारताना दाखवले आहे.  या व्यक्तीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो खाली पडला. आग 19 व्या मजल्यावर असल्याने. अशा स्थितीत येथे मदत आणि बचाव कार्य करण्यात अडचणी येऊ शकतात. जर आग लवकर आटोक्यात आणली नाही तर वरचे मजलेही आगीच्या भक्ष्यस्थानी जाऊ शकतात. 

घटनास्थळी मुंबईचे महापौर

इमारतीत रात्री 12 च्या सुमारास आग लागली. जखमी व्यक्तीला केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. खालच्या मजल्यावरील काही लोक स्वतः बाहेर आले आहेत. मुंबईचे महापौर घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी