परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्र्यांचा वाद सर्वोच्च न्यायालयात; ठाकरे सरकारने दाखल केली याचिका

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 07, 2021 | 03:50 IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख याच प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे.

mumbai former commissioner parmbir singh former home minister anil deshmukh
परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्र्यांचा वाद सर्वोच्च न्यायालयात  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात ठाकरे सरकारची आव्हान याचिका
  • अनिल देशमुखही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
  • महाराष्ट्र सरकारची बाजू ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी मांडतील

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(Parambir Singh) आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)याच प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे.  महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांनी देशातील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ठाकरे सरकारने अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या आरोपांची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. (mumbai former commissioner parmbir singh former home minister anil deshmukh case in supreme court )


मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारची बाजू ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी मांडतील. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध आम्ही राज्य सरकारच्या वतीने अपील दाखल केले आहे, 'असे महाराष्ट्र स्थायीचे वकील सचिन पाटील म्हणाले. तर देशमुख यांचे वकील सुधांशु एस चौधरी यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल केली आहे.


दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यां मधील वकील जयश्री पाटीलने पण सर्वोच्च न्यायालयात केविएट दाखल केली आहे. या केविएटमध्ये असे म्हटले की, न्यायालयात कोणता दुसरा निर्णय संमत होण्याआधी त्यांच्या याचिकेवर सुनावणी करावी. दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय चौकशी करण्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या याचिकेत परमबीर सिंह यांना पक्षकार बनवण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी