Mumbai : मुंबईकरांना खुशखबर ! वर्षभराचा प्रश्न मिटला, वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आला होता, तर मुंबईसह ठाण्यात अनेक भागात पाणीही साचले होते. परंतु या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांच्या वर्षाचा प्रश्न मिटला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या सात जलाशयांपैकी चार जलाशय ओव्हर फ्लो झाले आहेत. मंगळवारी दुपारी मध्य वैतरणा धरण ओव्हर फ्लो झाले आहे.

madhya vaitarana dam
मध्य वैतरणा धरण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे.
  • मुसळधार पावसामुळे मुंबईकरांच्या वर्षाचा प्रश्न मिटला आहे.
  • मंगळवारी दुपारी मध्य वैतरणा धरण ओव्हर फ्लो झाले आहे.

Water Source : मुंबई : मुंबईकरांसाठी एक खुशखबर (Good News) आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस  (heavy rain) पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर (flood) आला होता, तर मुंबईसह ठाण्यात (Mumbai Thane) अनेक भागात पाणीही (water logging) साचले होते. परंतु या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांच्या वर्षाचा प्रश्न मिटला आहे. मुंबईला पाणी पुरवठा (water supply ) करणार्‍या सात जलाशयांपैकी चार जलाशय ओव्हर फ्लो झाले आहेत. मंगळवारी दुपारी मध्य वैतरणा धरण (Middle Vaitarana Dam) ओव्हर फ्लो (over flow) झाले आहे. मध्य वैतरणा ओव्हर फ्लो झाल्याने धरणाचा पाच क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आला आहे. (mumbai water sources 4 out of 7 water resource full)

अधिक वाचा : Rahul Shewale : शिवसेना खासदार राहुल शेवाळेंविरोधात बलात्काराची तक्रार, पीडित महिलेने लावली सीडी

मोडक सागर, तानसा आणि तुळशी धरणीही ओव्हरफ्लो

मुंबईला पाणी पुरवठा करणारा मध्य वैतरणा धरण काल ओव्हरफ्लो झाले आहे. यापूर्वी मोडक सागर, तानसा आणि तुळशी धरणही ओव्हर फ्लो झाले आहेत. १३ जुलै रोजी मोडक सागर, १४ जुलै रोजी तानसा आणि १६ जुलै रोजी तुळशी धरण ओव्हर फ्लो झाले होते. आता १९ जुलै रोजी मध्य वैतरणा धरणही भरून वाहत आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या सात धरणांपैकी चार धरणं ओव्हरफ्लो झाल्याने मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.  

अधिक वाचा : शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, पीकविम्याच्या पोर्टलवरून मराठवाड्यातील अनेक गावं गायब

मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. तर वर्षाला मुंबईला पिण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या जलाशयांत १२ लाख ५४ हजार ३७७ दशलक्ष पाणी जमा झाले आहे. अपर वैतरणा आणि भातसा धरण पूर्ण भरल्यानंतर मुंबईला लागणार्‍या पाण्याची चिंता पूर्ण मिटणार आहे. 

अधिक वाचा : धक्कादायक ! दारू पाजून मूकबधीर ६५ वर्षीय आजीवर सामूहिक बलात्कार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी