Mumbai Weather : मुंबईकरांना सज्ज व्हा, या दिवसापासून बसणार उन्हाचे चटके

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Feb 20, 2023 | 12:32 IST

Mumbai get ready the scorching sun will set from this day  : मुंबईतली थंडी संपून उन्हाळा सुरू होण्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.

Mumbai Weather
मुंबईकरांना सज्ज व्हा, या दिवसापासून बसणार उन्हाचे चटके  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईकरांना सज्ज व्हा, या दिवसापासून बसणार उन्हाचे चटके
  • मुंबईतली थंडी संपून उन्हाळा सुरू होण्याचे स्पष्ट संकेत
  • 2 दिवसांत मुंबईचे कमाल तापमान 37 ते 39 अंश से. एवढे होणार

Mumbai get ready the scorching sun will set from this day  : मुंबईतली थंडी संपून उन्हाळा सुरू होण्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 2 दिवसांत मुंबईचे कमाल तापमान 37 ते 39 अंश से. एवढे होणार आहे. कोकणामध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच (फेब्रुवारी 2023) पारा चाळीशीच्या घरात पोहोचेल आणि उन्हाचे चटके जाणवू लागतील. 

मुंबईसह महाराष्ट्राला बसणार उन्हाचे चटके, हवामान खात्याचा अंदाज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस मुंबईचे आकाश निरभ्र राहील. उन्हाचे चटके जाणवतील. रविवार 19 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईत सांताक्रुझ येथे ३६.५ से. आणि कुलाबा येथे ३४.२ अंश से. तर रत्नागिरी येथे ३५.१ अंश से. तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमान मागील 33 ते 35 अंश से. दरम्यान असल्याचे चित्र आहे. 

महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान खात्याचा इशारा

रत्नागिरी जिल्ह्याला सोमवार 20 फेब्रुवारी 2023 पासून उन्हाचे चटके जाणवू लागतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कच्छमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कच्छमधील स्थितीमुळे उत्तर महाराष्ट्रातही उन्हाची तीव्रता वाढणार आहे. महाराष्ट्रासोबत गोव्यामध्येही कमाल तापमानाचा पारा ३७ ते ३९ अंशांदरम्यान असेल. 

Preserving History Of Forts : गड-किल्ल्यांचा इतिहास जपू : मुख्यमंत्री

MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारची मोठी भेट, 2 महिन्यांचा पगार होणार

महाराष्ट्रातल्या प्रमुख शहर आणि जिल्ह्यांचे तापमान 

हवामान खात्याने रविवार 19 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी केलेल्या नोंदींनुसार महाराष्ट्रातल्या प्रमुख शहर आणि जिल्ह्यांचे कमाल आणि किमान तापमान... 

क्रमांक ठिकाण .कमाल तापमान अंश से. किमान तापमान अंश से.
1. मुंबई 37 19
2. रत्नागिरी 35 19
3. नाशिक 34 11
4. पुणे 34 09
5. कोल्हापूर 34 19
6. सोलापूर 36 17
7. औरंगाबाद 34 13
8. अमरावती 35 16
9. नागपूर 35 15

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानंतर प्रशासनाच्या नागरिकांना सूचना

  1. शक्य असल्यास दुपारी (सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत) बाहेर पडणे टाळा. 
  2. दिवसभरात किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या. नारळपाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत प्या. शरीरातील पाण्याची पातळी सांभाळा.
  3. तब्येत बरी नसल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी