Double Decker road form Ghatkopar to Thane: कामानिमित्त मुंबई-ठाण्यात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दररोज लाखोंच्या संख्येत नागरिक प्रवास करत असतात मात्र, वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण होत असतात. या वाहतूक कोंडीवर आता एमएमआरडीएने पर्याय शोधला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबईतील पूर्व उपनगरातील घाटकोपरपासून ते ठाण्यापर्यंत डबल डेकर मार्ग तयार करण्यात येणार आहे.
ईस्टर्न एक्सप्रेस वे म्हणजेच पूर्व द्रुतगती महामार्गावर हा डबल डेकर मार्ग तयार करण्यात येणार आहे. हा मार्ग 13 किलोमीटर लांबीचा असणार आहे. घाटकोपरमधील छेडानगर जंक्शनपासून ते ठाण्यातील आनंद नगरपर्यंत हा मार्ग असणार आहे.
हे पण वाचा : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टिप्स
एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, डबल डेकर रोडच्या संदर्भातील संपूर्ण अभ्यास (फिजिबिलिटी स्टडी) पूर्ण करण्यात आला आहे. लवकरच याच्या संदर्भातील डीपीआर म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात येईल. हा मुंबईतील सर्वात लांब असा डबल डेकर रोड असेल ज्यावर दोन्ही बाजूंना 3-3 लेन्स असणार आहेत.
हे पण वाचा : सकाळी रिकाम्या पोटी काळा चहा पिण्याचे 5 जबरदस्त फायदे
प्राधिकरणाच्या बैठकीत ईस्टर्न एक्सप्रेस-वे हा मार्ग वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी डबल डेकर मार्गाच्या प्रकल्पाला मंजूरी मिळाली आहे. एलिवेटेड कॉरिडॉर हा ईस्टर्न फ्री वे सोबत कनेक्ट होताच गाड्या सुसाट ठाण्याहून घाटकोपरपर्यंतचा टप्पा गाठू शकतील.
एमएमआरडीएचे आयुक्त एस व्ही आर श्रीनिवासन यांनी म्हटलं की, हायवेवर एलिवेटेड कॉरिडॉर तयार झाल्यावर मुंबई-ठाणे दरम्यान होणारी वाहतूक कोंडी संपुष्टात येईल. वाहन चालकांना कुठल्याही अडथळ्याशिवाय मुंबईहून ठाण्यापर्यंतचा आणि ठाण्याहून मुंबईपर्यंतचा प्रवास करता येईल.
हे पण वाचा : टॉवेल न धुतल्याने होऊ शकते मोठे नुकसान
ईस्टर्न एक्सप्रेस वे हा सायन जंक्शनपासून ते ठाण्यातील माजिवडा जंक्शनपर्यंत आहे. गुजरात आणि नाशिकच्या दिशेकडून येणारी वाहने या हायवेवरुन मुंबईत प्रवेश करतात. या मार्गावरुन तासाला हजारो वाहनांची ये-जा होत असते. गर्दीच्या वेळी या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. गेल्याकाही वर्षांत वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने ही समस्या वाढतच असल्याचं दिसत आहे.
हे पण वाचा : हाता-पायाला मुंग्या येतात? जाणून घ्या घरगुती आणि रामबाण उपाय
एमएमआर क्षेत्रात नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सहज पोहोचता यावे यासाठी एमएमआरडीएकडून विविध योजनांवर काम सुरू आहे. यासाठी शिवडी - न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट, शिवडी - वरळी कनेक्टर, विरार - अलिबाग कॉरिडॉर, वसई - भाईंदर ब्रिज कोस्टल रोड, वर्सोवा - वांद्रे आणि वांद्रे - वरळी सी लिंक एकमेकांना कनेक्ट करण्यात येणार आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.