Mumbai Crime: महिलांकडून पैसे आणि दागिने चोरणारी सिनियर सिटीझन गँग गजाआड

ऑनलाईन चोरी असो वा लोकांकडून पैसे, दागिने चोरण्याच्या घटना असो. बहुतांश अशा प्रकारे गुन्ह्यांमध्ये तरुण आरोपी असतात. परंतु मुंबईत वृद्ध महिलांना लुटणारा एक वृद्ध गुन्हेगार गजाआड झाला आहे. गोवंडी पोलिसांनी ६२ वर्षाच्या आसिफ शब्बीर सैय्यदला अटक केली आहे.

senior citizen
ज्येष्ठ नागरिक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ऑनलाईन चोरी असो वा लोकांकडून पैसे, दागिने चोरण्याच्या घटना असो. बहुतांश अशा प्रकारे गुन्ह्यांमध्ये तरुण आरोपी असतात.
  • मुंबईत वृद्ध महिलांना लुटणारा एक वृद्ध गुन्हेगार गजाआड झाला आहे.
  • गोवंडी पोलिसांनी ६२ वर्षाच्या आसिफ शब्बीर सैय्यदला अटक केली आहे.

मुंबई: ऑनलाईन चोरी (Online Fraud) असो वा लोकांकडून पैसे, दागिने चोरण्याच्या (Theft) घटना असो. बहुतांश अशा प्रकारे गुन्ह्यांमध्ये तरुण आरोपी (Young Accused) असतात. परंतु मुंबईत (Mumbai) वृद्ध महिलांना (Senior Citizen Women) लुटणारा एक वृद्ध गुन्हेगार गजाआड झाला आहे. गोवंडी पोलिसांनी (Govandi Police) ६२ वर्षाच्या आसिफ शब्बीर सैय्यदला अटक केली आहे.

अधिक वाचा : Ranveer Singh: 'अभिव्यक्तीच्या नावाखाली न्यूड फोटो सेशन चालतं तर बुरखा का नको?', अबू आझमींचा सवाल

आसिफवर आरोप आहेत की घराबाहेर कामानिमित्त निघालेल्या वृद्ध महिलांकडून पैसे आणि दागिने चोरायचा. या आसिफ विरोधात चोरीचे विविध ५८ गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांत आसिफ एकटा नसून त्याची पूर्ण गँग आहे. आसिफ आणि त्याची टोळी गोवंडी, मानखुर्द आणि चेंबुर भागात फिरतात आणि कुणी वृद्ध महिला दिसली की मदतीच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसे, मोबाईल आणि दागिने लंपास करतात.

अधिक वाचा : केसरकरांना शह देण्याची मोठी खेळी, सिंधुदुर्गातील मोठ्या नेत्याने बांधले शिवबंधन

मदत घेणे पडले महाग

२५ जून रोजी एक ७० वर्षीय वृद्ध महिला घरी जात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रस्ता खराब असल्याने महिलेला चालताना त्रास होत होता. त्यामुळे या महिलेने आसिफकडे मदत मागितली. खराब रस्ता आहे, चालताना तुम्ही पडू शकता असे आसिफने महिलेला सांगितले. तसेच या महिलेचा मोबाईल, पैसे आणि दागिने एका पिशवित ठेवायला सांगितले. थोडा वेळ चालल्यानंतर आसिफने ही पिशवी या महिलेला परत केली. महिलेने पिशवीत पाहिले तर सर्व ऐवज चोरीला गेला होता या पिशवीतील तब्बल ८० हजार रुपयांचे सोने आसिफने लंपास केले होते. नंतर या महिलेने गोवंडीत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून या घटनेचा खोलवर तपास केला आणि आसिफला अटक केली. असे असले तरी या आसिफचे साथीदार अजून फरार आहेत, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

अधिक वाचा : Sharad Pawar : एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सिक्युरिटी दिली होती, शरद पवार यांची माहिती

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी