Mumbai crime: वाढदिवसाचं गिफ्ट देण्यासाठी गर्लफ्रेंडला घेऊन पोहोचला मॉलमध्ये अन् घडलं असं की दोघेही पोहोचले जेलमध्ये

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 10, 2022 | 16:48 IST

Mumbai Crime news: गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी बॉयफ्रेंड तिला मुंबईतील मॉलमध्ये घेऊन गेला. मात्र, त्या ठिकाणी एक वेगळीच घटना घडली. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईत घडली ही घटना, मुलगी मुंबईची तर तरुण दिल्लीत राहणारा
  • मुलगा हा इंजिनिअर आहे तर मुलगी बेरोजगार
  • पोलिसांनी रिक्षा चालकाच्या जबाबावरुन माहिती मिळवत आरोपी तरुणीला घेतलं ताब्यात

Mumbai latest news updates: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. प्रेयसीच्या वाढदिवसाला तिला गिफ्ट देण्यासाठी बॉयफ्रेंड तिला गिफ्ट घेण्यासाठी एका मॉलमध्ये गेला पण तिथे वेगळीच घटना घडली. यामुळे आता दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. (mumbai grime news girlfriend and boyfriend reached in jail after theft diamond ring in mall crime news marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीचं नाव सुचेता देवी असे आहे. तर तिचा बॉयफ्रेंड हा एक इंजिनिअर असून तो दिल्लीत राहतो. मात्र, सध्या नोकरी निमित्त तो मुंबईतच वास्तव्यास आहे. गेल्या महिन्यातच तो मुंबईत राहण्यास आला. १ ऑगस्टला त्याच्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस होता आणि त्यासाठी तिला गिफ्ट द्यावं म्हणून तो तिला घेऊन गोरेगाव येथील एका मॉलमध्ये गेला. 

पोलिसांनी सांगितले की, १ ऑगस्ट रोजो प्रेयसीचा वाढदिवस होता. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हे मॉलमध्ये फिरायला दाखल झाले. त्या ठिकाणी एका ज्वेलरी आऊटलेटच्या ठिकाणी हे पोहोचले. बॉयफ्रेंड हा एक डायमंड रिंग आपल्या गर्लफ्रेंडला देऊ इच्छित होता. त्यासाठी ते ज्वेलरी आऊटलेटमध्ये डायमंड रिंग सुद्धा पाहू लागले. मात्र, गर्लफ्रेंडला रिंग आवडली नाही. त्यानंतर ते दोघेही तेथून निघून गेले.

अधिक वाचा : Crime News : दुष्ट्यात्म्याच्या संशयावरून सख्ख्या आईवडिलांकडून सहा वर्षीय मुलीचा खून, पोलिसांकडून अटक

यानंतर दोघेही एका रिक्षात बसून संजय गांधी नॅशनल पार्कच्या दिशेने निघाले. मात्र, शॉपमधून निघत असताना गर्लफ्रेंडने तेथून एक डायमंड रिंग चोरी केली होती. या प्रकरणाची माहिती संबंधित शॉप मालकाने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शॉपमधील सीसीटीव्ही आणि मॉलच्या बाहेरील सीसीटीव्ही तपासले. मॉलच्या बाहेरील सीसीटीव्हीत दिसून आलं की ते एका रिक्षात बसून निघून गेले. त्या रिक्षाच्या रजिस्ट्रेशन नंबर आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी चालकाची माहिती मिळवली.

त्यानंतर पोलिसांनी त्या रिक्षा चालकाकडून माहिती घेत दोघांना कुठे सोडलं हे कळालं. गोरेगाव पूर्वेकडे ही आरोपी मुलगी राहते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी मुलीचा फोटो काढला आणि त्या परिसरात चौकशी केली असता तिचा पत्ता अखेर मिळाला. सात ऑगस्ट रोजी आरोपी तरुणीला पोलिसांनी ट्रेस केलं आणि ताब्यात घेतलं. त्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडलाही ताब्यात घेतलं. या चोरी प्रकरणात आरोपी तरुणीचा बॉयफ्रेंड सहभागी आहे की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नसल्याने त्याचे नाव पोलिसांनी दिलेले नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी