Mumbai Health: चार एक्सपर्टमुळे BMC हॉस्पिटलमध्ये कमी खर्चात ऑपरेशन्स

मुंबई
Updated May 16, 2019 | 13:21 IST | Mumbai Mirror

Mumbai Health: मुंबईतील चार ख्यातनाम डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने बीएमसीच्या हॉस्पिटल्सना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. हे चारही डॉक्टर बीएमसीच्या ज्युनिअर डॉक्टरना प्रशिक्षण देतील आणि ऑपरेशन्सही करतील.

Doctors will cooperate to BMC hospitals
चार डॉक्टरांची बीएमसीला सहकार्य करण्याची तयारी   |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : सध्या भारतात शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींवरचा खर्च सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यातही मुंबई सारख्या शहरात आरोग्यावरील खर्च झेपणारा नाही. पण, आता ही परिस्थिती बदलणार आहे. मुंबईतील चार ख्यातनाम डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने बीएमसीच्या हॉस्पिटल्सना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. हे चारही डॉक्टर बीएमसीच्या ज्युनिअर डॉक्टरना प्रशिक्षण देणार आहेत. तसेच बीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्सही करणार आहेत. त्याच्या या निर्णयामुळे खासगी हॉस्पिटल्समध्ये तीन ते पाच लाख रूपयांत होणारी ऑपरेशन्स आता बीएमसीच्या हॉस्पिटल्समध्ये २५ ते ५० हजार रूपयांत होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील सर्वसामान्य गरजू रूग्णांना याचा लाभ होणार आहे.

लाखांची ऑपरेशन्स आता हजारांत

यामध्ये ग्लोबल हॉस्पिटलचे एन्डोस्कोपी एक्सपर्ट डॉ. अमित मेदेव, एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे हदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा, ब्रीच कँडी हॉस्पिटलचे कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुल्तान प्रधान आणि सैफी हॉस्पिटलचे डॉ. मुफ्फाझल लखडावाला यांचा समावेश आहे. मुंबईतील केईएम, सायन, नायर आणि कूपर हॉस्पिटलमध्ये हे चारही निष्णात डॉक्टर रूग्णसेवेसाठी उपलब्ध असणार आहेत. यामध्ये डॉ. मेदेव यांच्या ट्रिटमेंटचा खर्च खासगी हॉस्पिटलमध्ये तीन ते पाच लाख रूपयांच्या आसपास जातो. तर, बीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये हा खर्च २५ ते ५० हजार रूपयेच येणार आहे. डॉ. प्रधान यांच्यासाठी एका ऑपरेशनचा खर्च दोन ते पाच लाखांच्या आसपास आहे. तो बीएमसी हॉस्पिटलमध्ये ५० हजार ते एक लाख रूपये येणार आहे. डॉ. प्रधान यांचा खासगी हॉस्पिटलमधील ऑपरेशन खर्च तीन ते आठ लाखांच्या आसपास आहे. पण तो खर्च महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एक ते दीड लाख येणार आहे. तर, डॉ. लखडावाला पाच ते सहा लाख रूपयांचे ऑपरेशन बीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये ५० हजार रूपयांत करून देणार आहेत.

डॉक्टरांची हवे ते सहकार्य  करण्याची तयारी 

या संदर्भात मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी म्हणाल्या, ‘आम्ही मुंबईतील या चार एक्सपर्ट डॉक्टरांना विनंती केली. बीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये पुरेशी साधने आहेत. पण, ऑपरेशनसाठी एक्सपर्ट डॉक्टर्स आणि टिचिंग डॉक्टर्सची कमतरता असल्याचे आम्ही त्यांना सांगितले. बीएमसीमध्येही तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. पण, वैद्यकीय क्षेत्र सातत्याने बदल आहे. या निष्णात डॉक्टरांचा अनेक नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना विनंती केली आणि चारही डॉक्टरनी ती मान्य केली.’ इंडोस्कोपी केवळ रोगाचे निदान करण्यासाठी राहिलेली नाही. आपण इंडोस्कोपीने कोणतीही इजा न करता शस्त्रक्रियाही करू शकतो. मी बीएमसीच्या डॉक्टरांना हे तंत्रज्ञान शिकवणार आहे, असे डॉ. मेदेव यांनी सांगितले. डॉ. प्रधान म्हणाले, ‘मुंबईत सध्या केवल टाटा मेमोरियल सेंटरमध्ये सवलतीच्या दरात कॅन्सरवर उपचार होतात. पण, तेथे वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे. रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करणे हा यामागचा उद्देश आहे.’ डॉ. पांडा आणि डॉ. लखडावाला यांनीदेखील हवे ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Mumbai Health: चार एक्सपर्टमुळे BMC हॉस्पिटलमध्ये कमी खर्चात ऑपरेशन्स Description: Mumbai Health: मुंबईतील चार ख्यातनाम डॉक्टरांनी सेवाभावी वृत्तीने बीएमसीच्या हॉस्पिटल्सना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. हे चारही डॉक्टर बीएमसीच्या ज्युनिअर डॉक्टरना प्रशिक्षण देतील आणि ऑपरेशन्सही करतील.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
आंबेनळी घाटातील बस अपघात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार नोकऱ्या 
आंबेनळी घाटातील बस अपघात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार नोकऱ्या 
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर?
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर?
राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानं नाराज मनसे कार्यकर्त्यांनं स्वत: ला पेटवून घेतलं
राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानं नाराज मनसे कार्यकर्त्यांनं स्वत: ला पेटवून घेतलं
 राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर पहिल्यांदा बोलले उद्धव ठाकरे 
 राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर पहिल्यांदा बोलले उद्धव ठाकरे 
[VIDEO]: पुण्यातील धक्कादायक घटना, रस्त्यावर पार्क केलेल्या कारला दुसऱ्या कारची जोरदार धडक
[VIDEO]: पुण्यातील धक्कादायक घटना, रस्त्यावर पार्क केलेल्या कारला दुसऱ्या कारची जोरदार धडक
 येत्या १० दिवसात भाजपसोबत राहायचे की नाही हे ठरवणार : नारायण राणे 
 येत्या १० दिवसात भाजपसोबत राहायचे की नाही हे ठरवणार : नारायण राणे 
LIVE: ईडीच्या कार्यालयात सलग साडे चार तास राज ठाकरेंची चौकशी
LIVE: ईडीच्या कार्यालयात सलग साडे चार तास राज ठाकरेंची चौकशी
राज ठाकरेंनी काही चुकीच केले नसेल तर घाबरायची गरज नाही : भाजपा मंत्री राम शिंदे 
राज ठाकरेंनी काही चुकीच केले नसेल तर घाबरायची गरज नाही : भाजपा मंत्री राम शिंदे