aryan khan bail application in drugs case आर्यनची आजची रात्र जेलमध्येच, जामिनावर गुरुवारी सुनावणी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 27, 2021 | 20:26 IST

ड्रग पार्टी केसमधील आरोपी आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी उद्या (गुरुवार २८ ऑक्टोबर २०२१) होणार आहे. सुनावणी सुरू असल्यामुळे आर्यनचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम कायम आहे,

Mumbai high court gives next date on aryan khan bail application in drugs case
आर्यनची आजची रात्र जेलमध्येच, जामिनावर गुरुवारी सुनावणी 
थोडं पण कामाचं
  • आर्यनची आजची रात्र जेलमध्येच, जामिनावर गुरुवारी सुनावणी
  • जामीन अर्जावर पुढील सुनावणी उद्या (गुरुवार २८ ऑक्टोबर २०२१) होणार
  • आर्यनला ३० ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबईः ड्रग पार्टी केसमधील आरोपी आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी उद्या (गुरुवार २८ ऑक्टोबर २०२१) होणार आहे. सुनावणी सुरू असल्यामुळे आर्यनचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम कायम आहे, त्याला आजची रात्र जेलमध्येच काढावी लागेल. आर्यनला ३० ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी झाली आहे. Mumbai high court gives next date on aryan khan bail application in drugs case

मुंबईच्या उच्च न्यायालयात जामीन अर्जावरील सुनावणीत आर्यनसाठी ज्येष्ठ वकील मुकुल रोहितगी आणि अरबाझसाठी अमित देसाई युक्तीवाद करत आहेत. आजच्या (बुधवार २७ ऑक्टोबर २०२१) सुनावणीत दोन्ही वकिलांनी एनसीबीला काही प्रश्न विचारले. प्रकरण वैयक्तिक ड्रग सेवनाचे आहे, षडयंत्राचे नाही. ड्रग सेवन झाले होते तर यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय चाचणी का केली नाही; असे अमित देसाई म्हणाले.

एनसीबी आरोपींवर एकसमान आरोप करत आहे यामुळे नेमके कोणत्या आरोपीवर कोणते आरोप हे लक्षात येत नाही. जर आर्यनचा मोबाइल जप्त केला नाही तर त्याच्या व्हॉट्सअॅपचे चॅट कसे मिळवले आणि व्हॉट्सअॅप चॅट मिळवले तर त्याची प्रत युक्तीवाद करण्यासाठी आम्हाला देणे आवश्यक आहे. पण आम्हाला अद्याप हे चॅट मिळालेले नाही, असे रोहतगी म्हणाले.

आरोपींना अटक केली त्यावेळी वैयक्तिक ड्रग सेवनाशी संबंधित आरोप केले होते. पण नंतर आठ लोकांनी षडयंत्र केल्याचा आरोप करण्यात आला. काही दिवसांनी वीस जणांनी षडयंत्र केल्याचा आरोप करण्यात आला. पण षडयंत्र प्रकरणात कोणालाही अटक दाखवलेले नाही. ड्रग सेवन आणि षडयंत्र ही दोन स्वतंत्र प्रकरणे आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये सर्व नोंदी स्वतंत्र असणे अपेक्षित आहे. पण तसे आढळत नाही, असे अमित देसाई म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी