Dasara Melava : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाने पालिकेकडे अर्ज केला होता. परंतु मुंबई महानगरपालिकेने कायदा सुव्यवस्थेचा हवाला देत दोन्ही गटांना दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली होती. त्यामुळे शिवसेनेने या प्रकरणी कोर्टात धाव घेतली. आज कोर्टाने शिंदे गटाचा, शिवसेनेचा आणि मुंबई पालिकेचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने पालिकेचा निर्णय अंतिम नसल्याचे म्हटले तसेच पालिकेने अधिकाराचा गैरवापर केला असल्याचे सांगत कोर्टाने शिवसेनेला शिवाजी पार्कावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. वाचा आज मुंबई उच्च न्यायालयात काय झाले. (mumbai high court granted permission to shivsena get dasara melava in dadar shivaj park ground)
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.