विधानसभा निवडणूक २०१९: मुंबईतील उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई
Updated Oct 15, 2019 | 14:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Candidate booked rape case: विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या एका उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

mumbai independent candidate booked rape charges vidhansabha election 2019 politics
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • विधानसभा निवडणुकीत उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा दाखल
  • मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु

मुंबई: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच उमेदवार, कार्यकर्ते, राजकीय पक्ष आपल्या प्रचारात मग्न आहेत. मात्र, त्याच दरम्यान मुंबईतील एका उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोवंडी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सिराज शेख यांच्यावर एका अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती त्यानंतर सिराज शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिराज शेख हे गोवंडी शिवाजीनगर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. सिराज शेख हे माजी नगरसेवक असून आता ते विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. परदेशात स्कॉलरशिप मिळवून देण्याच्या नावाखाली एका १४ वर्षीय मुलीवर सिराज शेख यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 

१४ वर्षीय मुलीला सिराज शेख यांनी फॉर्म भरण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी माजी नगरसेवक सिराज शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे. 

सिराज शेख हे मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होते. यावेळी त्यांनी गोवंडी शिवाजीनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सिराज शेख हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून सिराज शेख हे नॉट रिचेबल झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी