मुंबईला नाही पाण्याची चिंता, शिल्लक आहे ५५ दिवसांचा पाणीसाठा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 09, 2022 | 09:50 IST

Mumbai is not worried about water, it has 55 days of water reserves : मागच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये चांगला पाऊस झाला. यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांमध्ये आणखी ५५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

Mumbai is not worried about water, it has 55 days of water reserves
मुंबईला नाही पाण्याची चिंता  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईला नाही पाण्याची चिंता
  • शिल्लक आहे ५५ दिवसांचा पाणीसाठा
  • पावसाचे वेळापत्रक थोडे पुढे सरकले तरी मुंबईकरांना पुढील काही दिवस तरी पाण्याची चिंता नाही

Mumbai is not worried about water, it has 55 days of water reserves : मुंबई : मागच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये चांगला पाऊस झाला. यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांमध्ये आणखी ५५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाचे वेळापत्रक थोडे पुढे सरकले तरी मुंबईकरांना पुढील काही दिवस तरी पाण्याची चिंता नाही. एकदा पाऊस आला की, पुन्हा पाणीसाठा वाढेल याची खात्री असल्यामुळे मुंबईकर निश्चिंत असल्याचे चित्र आहे.

उपलब्ध पाणीसाठा

मोडकसागर – ४६६३९ दशलक्ष लिटर

तानसा – १०८५९ दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा – ४४७९० दशलक्ष लिटर

भातसा – १०४२१० दशलक्ष लिटर

विहार – ३६४५ दशलक्ष लिटर

तुलसी – २३१९ दशलक्ष लिटर

मुंबईत होते पाणीगळती

मान्सूनची अनिश्चितता, पाणी चोरी आणि २७ टक्के पाणीगळती या सर्व कारणांमुळे मुंबईत दरवर्षी मे-जून दरम्यान काही वेळा मर्यादीत पाणीकपात केली जात होती. पण यंदा अशी पाणीकपात होणार नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी