मुंबई : कांजुरमार्गचे जम्बो कोविड सेंटर बंद करणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 16, 2022 | 08:36 IST

Mumbai : Kanjurmarg  Jumbo Covid Center will be close says BMC : मुंबईत १२ हजार ३४१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पण मनपाने कांजुरमार्गचे एक हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai : Kanjurmarg  Jumbo Covid Center will be close says BMC
मुंबई : कांजुरमार्गचे जम्बो कोविड सेंटर बंद करणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबई : कांजुरमार्गचे जम्बो कोविड सेंटर बंद करणार
  • मुंबईत १२ हजार ३४१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • हॉस्पिटलमध्येच दाखल करावे लागेल अशा कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

Mumbai : Kanjurmarg  Jumbo Covid Center will be close says BMC : मुंबईत १२ हजार ३४१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पण मनपाने कांजुरमार्गचे एक हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आता आढळत असलेले बहुसंख्य कोरोना रुग्ण हे घरी राहून उपचार घेऊ शकतील अशा स्थितीतले आहेत. हॉस्पिटलमध्येच दाखल करावे लागेल अशा कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसते. यामुळेच मुंबई मनपाने कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ३४१ झाली तरी कांजुरमार्गचे जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी दहिसरचे जम्बो कोविड सेंटर मुंबई मनपाने बंद केले.

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

मुंबई मनपा दहिसर पाठोपाठ कांजुरमार्गचे जम्बो कोविड सेंटर बंद करत आहे. कांजुरमार्गच्या जम्बो कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांट मुलुंड जकात नाका येथील जागेत स्थलांतरित केला जाईल. बंद केलेल्या कोविड सेंटरचे साहित्य पालिका हॉस्पिटलमध्ये पाठवले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबई मनपाने बुधवारी निविदा मागवल्या. 

कोरोना संकटामुळे मुंबईत मार्च २०२० मध्ये हॉस्पिटलमध्य खाटा अपुऱ्या पडत होत्या. या समस्येवर मात करण्यासाठी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आली. आता या सेंटरची आवश्यकता नसल्यामुळे ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे; अशी माहिती मुंबई मनपाने दिली. 

मुंबईत जम्बो कोविड सेंटर बांधण्याचे काम महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांनी संयुक्तपणे केले. मागील दोन वर्षांत जम्बो कोविड सेंटरचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. अनेक रुग्णांनी जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार घेतले. पण आता जम्बो कोविड सेंटरची आवश्यकता नसल्यामुळे ही सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे मुंबई मनपाने सांगितले. 

मुंबई मनपाने गोरेगाव, दहिसर, कांजुरमार्ग आणि मुलुंड अशी क्रमाक्रमाने जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी गोरेगाव आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आली आहेत. कांजुरमार्गचे जम्बो कोविड सेंटर करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. 

बंद केलेल्या कोविड सेंटरमधील औषधे, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन यांचे मुंबई मनपाच्या इतर हॉस्पिटलमध्ये वितरण केले जाईल. मुंबईत गोरेगाव, दहिसर, कांजुरमार्ग आणि मुलुंड या चार जम्बो कोविड सेंटरमधून ८२०० कोरोना रुग्णांवर एकाचवेळी उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यापैकी गोरेगावमध्ये सर्वाधिक २२०० कोरोना रुग्णांवर एकाचवेळी उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी गोरेगावचे जम्बो कोविड सेंटर बंद करून पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली. पाठोपाठ दहिसर आणि आता कांजुरमार्गचे जम्बो कोविड सेंटर बंद करून पाडण्याची प्रक्रिया सुरू आहे. कांजुरमार्ग जम्बो कोविड सेंटर येथील ४० मेट्रिक टन क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांट मुलुंड जकात नाका परिसर येथे स्थलांतरित केला जाईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी