महाराष्ट्रात नवा लसीकरण घोटाळा, निवडक नेत्यांना दिला बूस्टर डोस

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Sep 17, 2021 | 17:47 IST

महाराष्ट्रात नवा लसीकरण घोटाळा झाल्याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. केंद्र सरकार आणि आयसीएमआर यांच्याकडून सूचना आली नसताना महाराष्ट्रात परस्पर  बूस्टर डोस देण्याचा प्रकार सुरू आहे.

Mumbai: Leftover doses given as booster jab to health staff and politicians
महाराष्ट्रात नवा लसीकरण घोटाळा, निवडक नेत्यांना दिला बूस्टर डोस  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात नवा लसीकरण घोटाळा, निवडक नेत्यांना दिला बूस्टर डोस
  • बूस्टर डोस घेणाऱ्यांत राजकीय आणि आरोग्य क्षेत्रातील निवडक व्यक्तींचाच समावेश
  • 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले वृत्त

मुंबईः महाराष्ट्रात नवा लसीकरण घोटाळा झाल्याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. केंद्र सरकार आणि आयसीएमआर यांच्याकडून सूचना आली नसताना महाराष्ट्रात परस्पर  बूस्टर डोस देण्याचा प्रकार सुरू आहे. राज्यातील निवडक व्यक्तींना बूस्टर डोस देण्यात आला. यात राजकीय आणि आरोग्य क्षेत्रातील निवडक व्यक्तींचाच समावेश आहे. Mumbai: Leftover doses given as booster jab to health staff and politicians

केंद्र सरकारने देशातील सर्व पात्र नागरिकांना लसचे दोन्ही डोस (पहिला डोस आणि दुसरा डोस) देईपर्यंत बूस्टर डोसबाबत विचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण केंद्राच्या धोरणात्मक निर्णयाचे उल्लंघन करुन महाराष्ट्रात राजकीय आणि आरोग्य क्षेत्रातील निवडक व्यक्तींना बूस्टर डोस देण्यात आला. निवडक हॉस्पिटलच्या माध्यमातून हा प्रकार सुरू आहे. 

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्हीपैकी कोणतीही एक लस घेणाऱ्या व्यक्तीला ठराविक दिवसांच्या अंतराने संबंधित लसचे दोन डोस घ्यावे लागतात. भारताची लोकसंख्या १३९ कोटींपेक्षा जास्त आहे. देशातील ९० कोटींपेक्षा जास्त नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. यामुळे एवढ्या प्रचंड लोकसंख्येला लसचे दोन डोस देण्याची आव्हानात्मक मोहीम १६ जानेवारी २०२१ पासून सुरू आहे. भारताच्या लस निर्मिती प्रक्रियेत टप्प्याटप्प्याने वाढ करुन देशाची लसीकरणाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार लस निर्मात्यांशी समन्वय साधून देशातले लसीकरण शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येकाला लसचे दोन डोस मिळावे यासाठी भारत सरकार नियोजन करत आहे. हे नियोजन सुरू असताना महाराष्ट्रात काही जण परस्पर बूस्टर डोस घेऊन लसीकरणाचे नियोजन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

बुस्टर डोस प्रकरणी 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या प्रतिनिधीने महाराष्ट्राच्या लसीकरण कार्यक्रमाचे प्रमुख आणि आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याकडे चौकशी केली. प्रश्नांना उत्तर देताना डॉ. व्यास यांनी स्थानिक पातळीवर कुठे ही घटना घडली असल्यास अद्याप नेमकी माहिती हाती आलेली नाही अशा स्वरुपाचे मोघम उत्तर दिले. राज्यात अधिकृतरित्या बूस्टर डोस देण्याची मोहीम सुरू झालेली नाही. जर कोणी परस्पर स्थानिक पातळीवर बूस्टर डोस घेतला असेल तर माहिती नाही. पण ही कृती करणे धोक्याचे ठरू शकते. भारतात लसचा बूस्टर डोस देण्याची गरज आहे की नाही या संदर्भात अद्याप आयसीएमआरने अधिकृतरित्या काही सांगितलेले नाही. यामुळे परस्पर बूस्टर डोस घेणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

भारतात लस घेतलेल्यांना कोरोना होण्याचे प्रमाण नगण्य आहे. ज्यांना लस घेऊनही कोरोना झाला अशांमध्ये मृत्यूचे प्रमाण तर आणखी नगण्य आहे. ज्यांचा लस घेऊनही कोरोनाने मृत्यू झाला त्यांच्यात जुनाट आजाराने ग्रस्त असल्याची उदाहरणे आहेत. यामुळे भारतात सरकारी पातळीवरुन सातत्याने लस घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. कोरोना संकटापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आयसीएमआरच्या सूचनेनुसार लस घेणे हाच उपलब्ध असलेला सर्वोत्तम पर्याय आहे. पण पहिला किंवा दुसरा डोस देण्यासाठी केंद्राकडून राज्याला मिळालेल्या लसचा वापर बूस्टर डोससाठी झाल्यास लसीकरणाचे नियोजन अडचणीत सापडण्याचा धोका आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी