Bomb Attack Threat : मुंबई लोकल बॉम्बने उडवून देण्याची धमकी; रेल्वे पोलिसांना निनावी फोन, रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवली

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 14, 2021 | 07:44 IST

Bomb Attack Threat :मुंबईच्या लोकलवर (Mumbai Local) बॉम्ब हल्ला (Bomb Attack) करण्यात येणार असल्याचा निनावी फोन (Anonymous phone call) रेल्वे पोलिसांना (Railway police) आल्याने खळबळ उडाली आहे. एका निनावी कॉलच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.

Mumbai local bomb threat
Bomb Attack Threat : मुंबई लोकल बॉम्बने उडवून देण्याची धमकी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रेल्वे पोलीस यंत्रणेची टीम बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडसोबत स्टेशन परिसरात दाखल.
  • सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिसांना कोणतीही संशयित वस्तू आढळून आलेली नाही.
  • बांद्रा जीआरपी पोलिसांना शनिवारी संध्याकाळी 6:25 वाजण्याच्या दरम्यान धमकीचा फोन

Bomb Attack Threat : मुंबई : मुंबईच्या लोकलवर (Mumbai Local) बॉम्ब हल्ला (Bomb Attack) करण्यात येणार असल्याचा निनावी फोन (Anonymous phone call) रेल्वे पोलिसांना (Railway police) आल्याने खळबळ उडाली आहे. एका निनावी कॉलच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच हा फोन आल्यानंतर मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांत (Railway Stations) सुरक्षा (Security ) व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस यंत्रणेची टीम बॉम्ब स्कॉड (Bomb Squad) आणि डॉग स्कॉडसोबत स्टेशन परिसरात दाखल झाली आहे. स्थानकांवर सर्च ऑपरेशन (Search operation) सुरू असून सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिसांना कोणतीही संशयित वस्तू याठिकाणी आढळून आलेली नाही. मुंबई लोकलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

लोकल स्थानकावर देखील जीआरपी आणि मुंबई पोलिसांची टीम तैनात करण्यात आली होती. स्थानकांवर येणाऱ्या प्रत्येकांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. बांद्रा जीआरपी पोलिसांना शनिवारी संध्याकाळी 6:25 वाजण्याच्या दरम्यान निनावी फोन आला होता. या फोनवरुन एका व्यक्तीनं पोलिसांना मुंबई लोकल बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली. या व्यक्तीने आपलं जावेद असल्याचं सांगितलं होतं. हल्लाची माहिती बांद्रा जीआरपी पोलिसांना मिळताच जीआरपीने सर्व सुरक्षा यंत्रणांना दिली माहिती.ज्याच्यानंतर मुंबई पोलिस, जीआरपी, डॉग स्कॉड आणि बॉम्ब स्कॉडकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले असून ते सुरू आहे. मुंबई लोकलची सुरक्षा वाढवण्यात आली असून सर्व यंत्रणा हायअलर्टवर आहे. मात्र हा कॉल कुठून आला याची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत. 

मुंबई पोलीस किती सतर्क हे पाहण्यासाठी स्थानकात बॉम्ब ठेवल्याची धमकी 

मुंबईच्या सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवेमुळे खळबळ उडाली होती. एका निनावी कॉलच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती. या प्रकरणाची माहिती आता समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशन, दादर रेल्वे स्टेशन आणि बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या पश्चिम उपनगरातील बंगल्यावर बॉम्ब असल्याचा दावा करणाऱ्या दोन मद्यधुंद इसमांनी खोटे कॉल करुन मुंबई पोलिसांनी झोप उडवली होती. राजू अंगारे आणि रमेश शिरसाट अशी या दोघांची नावे होती. सर्वात आश्चर्याची बाब अशी कि, या दोघांनी असा दावा केला की मुंबई पोलीस किती सतर्क आहेत हे तपासण्यासाठी त्यांनी हा कॉल केला होता.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी