Mumbai Local Railway : मुंबईकरांना दिलासा, आज मुंबई लोकल मार्गावर मेगाब्लॉक नाही

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 05, 2021 | 08:16 IST

Mumbai Local Railway Mega block Updates :मुंबईकरांना आज रविवारी दिलासा मिळाला आहे. कारण आज मुंबई लोकल रेल्वे मार्गावर कुठलाही मेगाब्लॉक असणार नाही. दरम्यान उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त 8 उपनगरीय विशेष गाड्या (Mumbai Local) चालवण्यात येणार आहेत. 

Mumbai Local Railway
आज मुंबई लोकल मार्गावर मेगाब्लॉक नाही   |  फोटो सौजन्य: Times Now

Mumbai Local Railway Mega block Updates : मुंबईकरांना आज रविवारी दिलासा मिळाला आहे. कारण आज मुंबई लोकल रेल्वे मार्गावर कुठलाही मेगाब्लॉक असणार नाही. आज मध्य रेल्वे (Central Railway), मुंबई विभाग (Mumbai Division) मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) – कल्याण विभाग आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल या दोन्ही उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक (Mega block) होणार नाही, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. दरम्यान उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त 8 उपनगरीय विशेष गाड्या (Mumbai Local) चालवण्यात येणार आहेत. 
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष गाड्या

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करता येणार आहे. कोरोनासंबंधित नियमांचे पालन करुन चैत्यभूमीवर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरीता 8 उपनगरीय विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.   

कसे असेल विशेष लोकलचं वेळापत्रक 

 मेन लाईन - अप विशेष:  

• 1 वाजता -कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विशेष कल्याण येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.30 वाजता पोहोचेल. 
• 2.15 वाजता- कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.45 वाजता पोहोचेल.

 मेन लाईन - डाउन विशेष:

 • 1.30 वाजता - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि कल्याण येथे 3.00 वाजता पोहोचेल.  
• 2.30 वाजता - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि कल्याण येथे 4 वाजता  पोहोचेल.

हार्बर लाइन - अप विशेष:

 • 1.15 वाजता-पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.30 वाजता पोहोचेल.  
• 2.30 वाजता-पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून  सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.50 वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन - डाउन विशेष:

• 1.40 वाजता -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि पनवेल येथे 3.00 वाजता पोहोचेल.  
•2.40 वाजता - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि पनवेल येथे 4.00 वाजता  पोहोचेल.   


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी