मुंबईत महिलेची छेड काढणाऱ्यांस शिवसैनिकांनी पकडले

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 18, 2022 | 18:02 IST

man molesting woman in mumbai : सांताक्रुझ पश्चिम येथे भाजी बाजारात महिलेची छेड काढण्याचा प्रकार घडला. सार्वजनिक ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला. 

Mumbai: Local Shiv Sena workers nab man who was molesting woman at vegetable market in Santacruz
मुंबईत महिलेची छेड काढणाऱ्यांस शिवसैनिकांनी पकडले  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत महिलेची छेड काढणाऱ्यांस शिवसैनिकांनी पकडले
  • पोलिसांनी आरोपींना आयपीसी ३५४ आणि ३५४ ए अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केले
  • आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत

Mumbai: Local Shiv Sena workers nab man who was molesting woman at vegetable market in Santacruz : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात महिलांचा आदर करा असे आवाहन केले. पण आजही अनेकजण महिलांचा अनादर करताना दिसत आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरात घडलेल्या घटनेवरून तरी तसेच दिसते. सांताक्रुझ पश्चिम येथे भाजी बाजारात महिलेची छेड काढण्याचा प्रकार घडला. सार्वजनिक ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला. 

मुलुखमैदानी तोफ असलेल्या गुलाबराव पाटलांना नीलम गोऱ्हेंनी सुनावलं, पाहा नेमकं काय घडलं?

महिलेची छेड काढण्याचा प्रकार सुरू असल्याचे स्थानिक शिवसैनिकांच्या लक्षात आले. शिवसैनिकांनी तातडीने छेड काढणाऱ्यास पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक २५ वर्षांची महिला सोमवारी संध्याकाळी गझदार बंद येथील भाजी बाजारात गेली होती. ती बाजारात असतानाच छेड काढण्याचा प्रकार घडला.

शिंदे-फडणवीस आणि पवारांसमोर दोन माईक का?, आशिष शेलारांचा विधानसभेत खोचक सवाल

एका व्यक्तीने अचानक महिलेचा हात धरला. या व्यक्तीसोबत आणखी तीन जण होते. पण या चौघांना न घाबरता महिलेने स्वतःचा हात सोडवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. महिला विरोध करत असल्याचे पाहून चौघांनी महिलेबाबत अश्लील टिप्पणी करायला सुरुवात केली. नेमक्या त्याच वेळी बाजाराच्या परिसरातून जात असलेल्या शिवसैनिकांनी हा प्रकार बघितला. एका महिलेला त्रास दिला जात असल्याचे बघून शिवसैनिक पुढे सरसावले. त्यांनी आधी महिलेची सुटका केली. नंतर महिलेला त्रास देणाऱ्या चौघांना शिवसैनिकांनी त्यांच्या स्टाइलने व्यवस्थित समजावले. यानंतर चौघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. 

Crime: मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला म्हणून महिलेने कापले लिव्ह इन पार्टनरचे गुप्तांग

पोलिसांनी स्थानिक इलेक्ट्रीशिअन अंकित खल्टो (२७) आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांना महिलेची छेड काढणे, जबरदस्तीने महिलेचा हात धरणे या प्रकरणात पकडले. महिलेने पोलीस ठाण्यात येऊन त्रास देणाऱ्या चौघांविरोधात तक्रार नोंदविली. यानंतर पोलिसांनी आरोपींना आयपीसी ३५४ आणि ३५४ ए अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची कारवाई पूर्ण केली. आरोपींना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी