Mumbai local train news updates: मुंबईतील लोकल ट्रेनमधून दररोज लाखोंच्या संख्येत नागरिक प्रवास करत असतात. लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. याच लोकल ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवासी पडल्याच्या अनेकदा बातम्या सुद्धा येत असतात. आता अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवरील वांद्रे ते माहिम या रेल्वे स्थानकादरम्यान एक 12 वर्षीय मुलगा लोकलमधून खाली पडला. (Mumbai Local Train 12 year old met with an accident after fall from a running train grp constable saved him)
मिळालेल्या माहितीनुसार, 12 वर्षीय मुलाचे नाव फरहान असे आहे. फरहान अन्सारी हा मुलगा आपल्या कुटुंबासोबत माहिम परिसरात राहतो. तीन भावंड आणि आई-वडिलांसोबत राहणारा फरहान 6 जानेवारीच्या दिवशी आपल्या मित्राकडून नोट्स आणण्यासाठी वांद्रे येथे निघाला होता. दुपारी जवळपास 12.20 वाजण्याच्या सुमारास तो लोकलमधून खाली कोसळला.
Police Constable Chetan Tatu saved a 12-year-old boy's life by rushing him to the hospital. The boy had met with an accident on the tracks between Bandra and Mahim railway stations and was bleeding profusely when the GRP personnel found him. — GRP Mumbai (@grpmumbai) January 7, 2023
वांद्रे रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर फरहान हा लोकलमधून खाली पडला होता. लोकलमधून खाली पडल्याने फरहानला दुखापत झाली होती. त्यावेळी कर्तव्यावर असलेले जीआरपीचे पोलीस कॉन्स्टेबल चेतन ताटू यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.
हे पण वाचा : अलिबागच्या आसपास फिरण्यासारखी प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाणे
वांद्रे-माहीम रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या अपघातात अल्पवयीन मुलाचा मोठयाप्रमाणात रक्तस्त्राव होत आहे. हे पाहून कर्तव्यावरील पोलीस अंमलदार चेतन ताटू यांनी प्रसंगवधान दाखवत तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने अल्पवयीन मुलाचे प्राण वाचले.
हे पण वाचा : शिळ्या चपाती, भाकरीपासून बनवा हे स्वादिष्ट पदार्थ
जखमी 12 वर्षीय फरहान याला उपचारासाठी तात्काळ सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, ज्यावेळी फरहानला रुग्णालयात आणले त्यावेळी त्याची प्रकृती खूप गंभीर होती त्याच्या हाडांना गंभीर दुखापत झाली होती.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.